हिंसाचार टाळण्यासाठी शब्दांवर नियंत्रण ठेवा – उपविभागीय पोलिस अधिकारी एस.एस.भगत

38
हिंसाचार टाळण्यासाठी शब्दांवर नियंत्रण ठेवा – उपविभागीय पोलिस अधिकारी एस.एस.भगत
मूल :- शब्द हे शस्त्र आहे.अनेकदा अपशब्द वापरल्याने दुस-याच्या भावना दुखावतात.असे शब्द जिव्हारी लागतात.त्यातून हिंसाचार घडतो.त्यामुळे नागरिकांनी ऐकमेकांशी संवाद साधताना शब्दांवर नियंत्रण ठेवले पाहिजे,एकात्मता साधण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत येथे नव्यानेच रूजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी एस.एस.भगत यांनी व्यक्त केले.येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात स्थानिक पत्रकारांशी  संवाद साधताना ते बोलत होते. पत्रकारांशी  वार्तालाप करताना त्यानी विविध गोष्टींचा उलगडा केला. तीस वर्षे पोलिस प्रशासनामध्ये माझी सेवा झाली.जवळपास दीडशे खुनाच्या गुन्हयाचा तपास केला. त्यातील बहुतांश गुन्हे हे शब्दांमुळेच झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तपासाअंती हे सिदध झाले असल्याचे ते म्हणाले. गुन्हेगारीकरण आणि हिंसाचाराचे मुळ कारण हे शब्दच असल्याने शब्द जपून वापरले पाहिजे असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. पोलिस उपविभागाय कार्यालयातंर्गत येणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालू तसेच अवैध दारूविक्री,अवैध पणे चालणारी गोवंश वाहतूक,सुगंधीत तंबाखूची  विक्री,वाढते चोरीचे प्रमाण,टवाळकी करणारी मुले,वाहतूक नियमांचे उल्लंघन यासर्वांवर आपली नजर राहणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी भगत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
पत्रकार संघातर्फे स्वागत
मूल तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी एस.एस.भगत यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.यावेळी संघाचे अध्यक्ष राजू गेडाम,उपाध्यक्ष युवराज चावरे,सचिव विनायक रेकलवार,जेष्ठ सदस्य दीपक देशपांडे,चंद्रकांत मनियार उपस्थित होते.
व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतीने सुदधा एस.एस भगत यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष संजय पडोळे,जिल्हा कार्याध्यक्ष गुरूदास गुरूनूले, अशोक येरमे,तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य भोजराज गोवर्धन,रमेश माहुरपवार,विनायक रेकलवार  उपस्थित होते.
आध्यात्मिक वातावरण
उपविभागीय पोलिस अधिकारी एस.एस.भगत हे आध्यात्मिक वातावरणातील आहेत.त्यांचे मूळ गाव हे संत गजानन नगरी अर्थात शेगाव हे आहे. संत गजानन महाराजांच्या आचार, विचारांचा त्यांच्या मनावर जबरदस्त पगडा आहे. सेवा करणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. जनतेची सेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे ते म्हणतात. याआधी ते अमरावती विभागात कार्यरत होते.तेथील राजकीय वातावरण आणि मेळघाट येथील जीवनशैली याच्यावर त्यांनी प्रकर्षाने प्रकाश टाकला.