चंद्रपूर लोकसभा निवडणूक – 2024
भाजपाचे सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि कॉंग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर यांच्या तुल्यबळ लढतीत
कोण बाजी मारणार ?
अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष
मूल :- चंद्रपूर लोकसभेसाठी 19 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे.त्यात कॅबिनेट मंत्री विरूदध विधानसभेच्या सदस्या असा हा सामना रंगतदार ठरणार आहे. कोण बाजी मारणार ? याची मोठी उत्सूकता मतदारांमध्ये आहे. भाजप आपला गड खेचून आणणार ? की ,कॉंग्रेस आपला गड कायम राखणार ? याकडे अख्ख्या महाराष्टाचे लक्ष लागले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या हंसराज अहिर यांना 5 लाख 14 हजार 744 मते मिळाली होती. तर कॉंग्रेसचे बाळू धानोरकर यांना 5 लाख 59 हजार 507 मते मिळाली होती. 44 हजार 763 मतांनी बाळू धानोरकर विजयी झाले होते. या निवडणुकीत वंचितचे राजेंद्र महाडोळे यांनी 1 लाख 12 हजार 71 मते मिळवून आश्चर्याचा धक्का दिला होता.बसपाचे सुशील वासनिक यांनी 11 हजार 810 मते घेतली होती. याही निवडणुकीत वंचित पक्षाचे उमेदवार किती मते घेणार, याकडे मतदारांचे डोळे लागले आहे. चंद्रपूर – वणी -आर्णी लोकसभा मतदार संघात वेगवेगळया जाती पंथाचे,भाषेचे लोक राहतात. त्यामुळे उमेदवाराच्या विजयासाठी जातीच्या फॅक्टरची मते निर्णायक ठरणार आहे. लोकसभा मतदार संघात ओबीसींची संख्या लक्षणीय आहे.त्यात कुणबी समाजाच्या मतदारांचा वाटा निर्णायक ठरणार आहे. विविध समाजांची गठठा मते उमेदवारांच्या विजयासाठी महत्वाची ठरणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 18 लाख 37 हजार 906 इतकी मतदार संख्या आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी पंधरा उमेदवार रिंगणात आहेत. परंतु ,थेट लढत भाजपाचे सुधीरभाऊ मुनगंटीवार विरूदध कॉंग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर अशीच रंगणार आहे. ही लढत अख्ख्या महाराष्टाचे लक्ष वेधून घेईल,यात तिळमात्र शंका नाही. 2004,2009 आणि 2014 मध्ये भाजपाने बाजी मारली होती.परंतु,2019 मध्ये कॉग्रेसने विजयश्री प्राप्त केली होती.त्यामुळे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या रूपाने भाजप आपला गेलेला गड खेचून आणणार काय ? असा प्रश्न मतदारांच्या मनात आहे. कॉेंग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर याही चंद्रपूर लोकसभा मतदार संघ साबूत राहण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. मुनगंटीवार यांच्या रूपाने तगडे आव्हान धानोरकर यांच्या पुढे आहे.एकंदरीत,चंद्रपूर लोकसभा मतदार संघात दुहेरी सामना रंगणार हे निश्चित असले तरी,तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार ? मतदारांचा कौल कोणाकडे वळणार ? हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
सुधीर मुनगंटीवार यांची विकास पुरूष म्हणून ख्याती आहे.बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा केलेला विकास त्यांच्या जमेची बाजू आहे.त्यामुळे भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचे तगडे आव्हान कॉंग्रेसचे प्रतिभा धानोरकर किती पेलणार यांची राजकीय वर्तूळात चर्चा आहे. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी जातीचे फक्टर सुदधा महत्वाचे ठरणार आहे.या क्षेत्रात कुणबी,तेली,माळी आणि आदिवासी समाज मोठया प्रमाणात आहे. तसेच इतर घटकही या क्षेत्रात महत्वाचा असल्याने कोणाच्या पारडयात कोणाची मते निर्णायक ठरणार हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.एकंदरीत जातीचे मते कोणाला तारणार आणि कोणला मारणार ?हे चित्र गुलदस्त्यात राहणार आहे. यासाठी दोन्ही पक्षांच्या जाहिर सभा,मेळावे,व्हिलेज टू व्हिलेज कार्नर सभा महत्वाच्या ठरणर आहे.
– विनायक रेकलवार,मुख्य संपादक,जनतेचा आवाज