चितेगावच्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

49

चितेगावच्या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

मूल :- श्रमिक एल्गार आणि टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरास चितेगाव येथे नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य शिबिर दिनांक 5 एप्रिल 2024 शुक्रवारी रोजी 10 ते 2 या वेळेत आयोजित करण्यात आले होते. शिबिरात चितेगाव, मोरवाही येथील शेकडो महिला पुरुष उपस्थित होते.शिबिरात ब्लड प्रेशर (रक्तदाब), शुगर (डायबिटीस), तोंडाचे आजार, स्त्रियांचे मासिक पाळी संबंधित आजार, रक्त तपासणी, थायरॉईड, हिमोग्लोबिन, सिकल सेल, लिव्हर आणि किडनी च्या तपासण्या करण्यात आले.एल्गार प्रतिष्ठानचे सचिव डॉ. कल्याण कुमार यांचे मार्गदर्शनात या शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरात डॉ आशिष बारब्दे, सूरज साळुंके, डॉ ट्विंकल धेंगले, नताशा देवघरे, वैष्णवी सहारे यांनी रुग्णांची तपासणी व उपचार केले.शिबिरात सरपंच कोमल रंधे, विजय सिद्धावार, पियुष रामटेके, आशा वर्कर शेवंता नागेंद्र सोनुले, संगीता याटकल्लेवार उपस्थित होते.