मूल तालुक्यात कार्यकत्यांचे ‘ एकला चलो रे…

113
मूल तालुक्यात कार्यकत्यांचे ‘ एकला चलो रे….‘ची भूमिका
आगामी विधानसभा डोळया समोर ठेवूनच पक्षकार्य
घोडा मैदान जवळ
जनतेचा आवाज – चंद्रपूर लोकसभा निवडणूक विश्लेषण
मूल  :- चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीची तारीख जवळ येत आहे. घोडा मैदान फार काही दूर नाही.त्यामानाने प्रचाराचा पाहिजे तसा जोर चढताना दिसत नाही.एकीकडे,उन्हाचा पारा चढत आहे.एप्रिल महिण्यातच उन्हाच्या झळा अंगाची लाही लाही करीत आहे. कदाचित त्यामुळेच निवडणुकीचा ज्वर चढत नसावा असा अंदाज राजकीय वर्तूळात वर्तविला जात आहे. परिणामी पक्षाचे कार्यकर्ते उन्हातान्हात फिरताना आढळत नाही. परंतु, मूल तालुक्यात कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते एकला चलो रे… ची भूमिका बजावत आहेत.आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून कॉंग्रेसचे जुने निष्ठावान पदाधिकारी,कार्यकर्ते माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटिल मारकवार प्रत्येक ग्रामिण भागात जावून डोअर टू डोअर प्रचार करीत आहेत. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेवून त्यांचे ते काम परिपूर्ण करीत आहेत.एकला चलो  रे…ही भूमिका कायम ठेवून त्यांचे निष्ठावान कार्य अविरत सुरू असल्याचे दिसत आहे.मूल तालुक्यातील अख्खा ग्रामिण भाग ते पिंजून काढत आहेत. दुसरीकडे माजी जिप उपाध्यक्ष विनोद अहिरकर हे सुदधा आपल्या नांदगाव,पोंभूर्णा क्षेत्रात एकला चलो रे… ची भूमिका बजावून कार्न्हर सभेवर जोर देत आहे. विमाशिने कॉंग्रेसच्या उमेदवारास पाठिंबा दिल्याने संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते सुदधा भेटीगाठीवर जोर देत आहे.कॉंग्रेसच्या  प्रचाराचा हा अजेंडा भाजपाने सुदधा राबविण्यास सुरूवात केली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि भाजपाच्या निष्ठावान पदाधिकारी मूल तालुका अध्यक्षा संध्याताई गुरूनूले या होत्या कार्यकर्त्याना सोबत घेवून प्रचाराचा नारळ ग्रामिण भागात फोडत आहेत.यदाकदाचित ‘ भाऊ ‘ लोकसभेवर निवडून गेल्यास बल्लारपूर विधानसभेसाठी संध्याताई गुरूनूले भाजपातर्फे प्रबळ दावेदारी ठोकू शकतात. संध्याताई गुरूनूले या पक्षाच्या अभ्यासू कार्यकर्त्या असून मूल तालुका त्यांच्या साठी नवीन नाही.तालुक्यातील तीनही जिल्हा परिषद क्षेत्रातून त्या निवडून आलेल्या आहेत.तसेच त्या माळी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात.त्यामुळे त्याही आगामी विधानसभेसाठी गुडघ्याला बांशिंग बांधून आहेत.त्यांच्या रूपाने एक महिला आमदार या क्षेत्राला मिळू शकते असा राजकीय अंदाज वर्तूळात आहे. कॉंग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर या लोकसभेसाठी ‘ लकी ‘ ठरल्यास भद्रावती- वरोरा विधानसभा मतदार संघात अनेकांनी संधीची दारे खुली होवू शकतात. समजा,भाजपाचे सुधीरभाऊ मुनगंटीवार लोकसभेसाठी बाजी मारल्यास बल्लारपूर विधानसभा क्षेत्र भाजपा सह कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी अरूणोदय ठरणार आहे. भाजपाच्या संध्याताई गुरूनूले यांच्यासह कॉग्रेसचे संतोष रावत,प्रकाश पाटिल मारकवार,विनोद अहिरकर आणि नव्यानेच प्रक्षात प्रवेश घेतलेले डॉ.अभिलाषा गावतूरे सर्वच जण इच्छूक ठरणारे आहेत. कोणाचे भाग्य कसे आणि कधी उजळणार ?  हे सर्व  लोकसभा  निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.तो पर्यत सर्वांनाच लोकसभेच्या निवडणुकीत  आगामी विधानसभेचे डोहाळे लागले आहेत. राजकीय वर्तूळात आगामी विधानसभेच्या चर्चांवरच बैठकीत ‘ फेर ‘ धरल्या जात आहे.  शेवटी ‘ जनतेचा आवाज ‘ निर्णायक ठरु शकतो.
श्री. विनायक रेकलवार
मुख्य संपादक