शिवसेना कार्यालय हे सर्वधर्मसमभावाचे मंदिर — संदिप गि—हे , मूल शहरातील मुस्लिम बांधवांसह अनेक युवकांचा  शिवसेना ( उबाठा) पक्षात प्रवेश

38
शिवसेना कार्यालय हे सर्वधर्मसमभावाचे मंदिर — संदिप गि—हे
मूल शहरातील मुस्लिम बांधवांसह अनेक युवकांचा  शिवसेना ( उबाठा) पक्षात प्रवेश
शिवसेना ( उबाठा)पक्षाच्या सर्वधर्मसमभावाला युवकांची मोठी पसंती
मूल :- राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस होणारा बदल व सध्याची परिस्थिती बघता युवकांचा कल शिवसेना ठाकरे गटाकडे वाढतच चालल्याचे दिसत आहे.पक्ष प्रमुख उद्धव  ठाकरे यांचे विचार सर्वधर्मसमभावाचे आहे. ८० टक्के समाजकारण  आणि २० टक्के राजकारण हा  विचार असल्याने  अनेक युवकांचा कल  शिवसेना उबाठा कड़े चालून येत आहे.याच विचारांची मशाल हातात घेऊन जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात मूल शरातील मुस्लिम बांधव यांच्या  समवेत अनेक युवकांनी शुक्रवारी शिवसेना (उ.बा.ठा) प्रवेश केला.सदर पक्षप्रवेश कार्यक्रम शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे उपस्थितीत शिवसेना कार्यालय येथे पार पडला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचे धडाडीचे कार्य बल्लारपुर  विधानसभा क्षेत्रात  सुरु आहे. याच कार्याची पावती म्हणून जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे
यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख आकाश अजय राम आनी तोहिद शेख यांच्या नेतृत्वात शहरातील अनेक मुस्लिम बांधव तसेच युवकांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी संदीप गिऱ्हे यांनी जनसेवे करिता उभारलेले शिवसेना कार्यालय आज सर्व धर्म समभावांचे मंदिर बनले आहे असे मत व्यक्त केले. संदीप गि—हे यांच्या  मार्गदर्शनात प्रशांत गट्टूवार यानी अरबाज भाई शेख, सय्यद उर्फ बाबू सय्यद अली,इमरान शेख,इरशाद पठान सूरज अत्राम सैफ महाजन, यांच्या गळ्यात दुपट्टा टाकत शिवसेना परिवारात स्वागत केले.यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना  प्रशांत गट्टूवार यानी सांगितले की, हे कार्यालय मूल शहरातिल समस्या सोडविन्यासाठी केव्हाही  तयार आहे.  वाढती बेरोजगारी आणि शहरातिल असंख्य समस्या आहेत ते सोडविण्याचे आश्वासन  यावेळी गटटूवार यांनी दिले . शहरातील व तालुक्यातील गोरगरिबांचे प्रश्न २४ तास  सेवाभावातुन कर्यालयातून सोडविण्यात येतील असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.यावेळी शहर प्रमुख आकाश अजय राम यांनी वार्ड तिथे शाखा घर तीथे शिव सैनिक हा संकल्प यावेळी हाती घेताला असल्याचे सांगितले.या वेळी शहर प्रमुख अमित आयलानी यांची प्रमुख उपस्थिति होती.
पक्षप्रवेश घेनारे इमरान शेख,सौरव गिरडकर,कृष्णा अंमदुर्तिवार,सरफराज पठान,सन्नी रिजवी,तोहिद शेख याटो यूनियन सदस्य,यासीर शेख, तोफिक पठान,समीर शेख तसेच असंख्य मुस्लिम बांधव समवेत अनेक कार्यकर्त्यांच शिवसेनेत प्रवेश घेण्यात आला.तसेच मुल शहरातील प्रभाग क्र ८ मधिल युवा कार्यकर्ते प्रशीक घोगरे,श्रावण दोरिवार यांचे समवेत असंख्य कार्यकर्ते सहित युवकांनी रवीवार दि.७ एप्रिल रोजी शिवसेना (उ.बा.ठा) प्रवेश केला.सदर पक्षप्रवेश शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.