अज्ञात वाहनाच्या धडकेने चितळाचे पिल्लू जखमी
मूल :— एका अज्ञात वाहनाच्या धडकेने चितळाचे पिल्लू जखमी झाले.ही घटना चंद्रपूर मार्गावरील डोणी फाटयाजवळ सोमवारी रात्री घडली. चंद्रपूर मार्गे मूल कडे येणा—या गोल्डी भोयर याला चितळाचे पिल्लू जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला विव्हळताना दिसले.त्यांनी आपले वाहन थांबवून जखमी अवस्थेतील पिल्लाला मूल मध्ये आणून त्याला संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, अंकुश वाणी, स्वप्नील आक्केवार यांच्या स्वाधीन केले. या घटनेची माहिती मूलचे प्रभारी क्षेत्र सहाय्यक राकेश गुरनुले, वनरक्षक सूधीर ठाकुर, अस्थायी वनमजूर विशाल टेकाम यांना देण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ संदिप छौंनकर यांनी त्वरित येऊन जखमी चितळाच्या पिल्लूवर प्राथमिक उपचार केले. त्याला जानाळा येथे पिंज—यात ठेवण्यात आले आहे. मंगळवारी सुदधा डॉ संदिप छौंनकर, वनकर्मचारी यांनी चितळाची तपासणी करून उपचार करण्यात केले.चिचपल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांच्या सुचनेनुसार पुढील उपचारासाठी चितळाच्या पिल्लाला चंद्रपूर येथील प्राणी उपचार केंद्र येथे नेण्यात आले.