वृद्ध नागरीक व दिव्यांगाच्या गृह मतदानासाठी दहा पथकाची निर्मिती
पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकीत गृह मतदानाची पर्यायी सोयमूल :—निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये पहिल्यांदाच ८५ वर्षांवरील नागरिक तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना गृह मतदानाची पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार बल्लारपूर विधानसभा अंतर्गत एकूण 253 नागरिकांनी गृह मतदानाची इच्छा दर्शविली आहे. त्यानुसार दहा पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. 13—चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 72 — बल्लारपूर विधानसभा मतदार संघामधील ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदारांकरीता दिनांक 8 एप्रिल ते 11 एप्रिल या चार दिवसांपर्यंत गृह मतदानाकरिता एकूण 10 पथके रवाना करण्यात आलेली आहे. त्याची सुरुवात सोमवारी मूल येथून करण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, पात्र असलेला एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये,यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. मूल , पोंभूर्णा, बल्लारपूर या विधानसभा क्षेत्रात 85 वर्षावरील ज्येष्ठ मतदार 197 तर दिव्यांग मतदार 56 असे एकूण 253 मतदारांना गृह मतदानाची सोय घरपोच पोस्टल बॅलेट द्वारे करून देण्यात येणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी कार्यरत कर्मचा—यांसाठी सुइधा दुस—या प्रशिक्षणाच्या दिवसी पोस्टल बॅलेट पेपर द्वारा मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली होती.तसेच निवडणुकीच्या दिवसी सुदधा कर्तव्यावरील कर्मचा—यांसाठी इडीसी द्वारा मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मूल शहरात 26 जणांनी केले गृह मतदान
मूल :- सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ सोमवारी मूल येथून झाला. मूल शहरातील एकूण 26 वृद्ध व दिव्यांग असलेल्या मतदारांनी गृह मतदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार प्रशासनाने त्यांच्याकडून नमुना 12 – डी भरून घेतला होता. त्यांनी आपले मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदविले आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिका-यांकडे सुपूर्द केली. या टीममध्ये तीन मतदान अधिकारी, केंद्र स्तरीय अधिकारी, पोलिस अंमलदार, छायाचित्रकार उपस्थित होते. प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली. गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्यात आली.