लोकसभा उमेदवार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ संध्याताई गुरनुले यांचा झंझावाती प्रचार दौरा
चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय उमेदवार महाराष्ट्राचा बुलंद आवाज, विकास पुरुष आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दिनांक 06 एप्रिल ते 11एप्रिल दरम्यान गोंडपिपरी तालुक्यातील कोठारी व मूल तालुक्यातील चिरोली, भगवानपुर, सुशी, दाबगाव, मंदातूकूम, केळझर, फिस्कुटी, राजोली, डोंगरगाव, मारोडा, भादुर्णी, उश्राळा,चीतेगाव, चिखली, बेलगाटा व विविध गावातील माळी समाज बांधव,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन व संवाद साधून आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केलेल्या विकासकामावर विश्वास ठेवून जातीपातीचे राजकारण न करता समाजाने व मतदारांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून राष्ट्रहित व गोरगरिबांच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करावे असे आवाहन जिल्हा परिषद चंद्रपूरच्या माजी अध्यक्ष व माळी महासंघ महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष, चंद्रपूर जिल्ह्याच्या भाजपा महामंत्री श्रीमती संध्याताई गुरनुले यांनी केले.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा मूल शहर अध्यक्ष युवराज चावरे यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी गावागावातील कॉर्नर सभेला पंचायत समिती मूल चे माजी उपसभापती सुनील आयलनवार, माजी पंचायत समिती सदस्य वर्षाताई लोनबले, सुभाष बुक्कावार, मुकेश गेडाम, विवेक ठीकरे, हितेश ठीकरे, बंडू नर्मलवार, तुषार ढोले, सचिन गुरनुले, भिकारू शेंडे,अनुप नेरलवार, चंदुभाऊ मुद्दमवार,रामू उत्तरवार, चंदूभाऊ नामपल्लीवार, हरिदास गोहने, ताराबाई चांभारे, रघुनाथ गावडे, वासुदेव वाघ, प्रकाश मेश्राम, गुलाब मेश्राम, चरण शेडमाके, संतोष कुळमेथे ,प्रशांत पुल्लीवार, सतीश कावळे, राकेश गिरडकर, प्रदीप धाबेकर, साईनाथ बावणे, किशोर कोटरंगे, सुरज गुरनुले, सौरभ तरारे, राकेश झोलमवार, प्रमोद कडस्ककर, भिकाजी मोहूर्ले, बहुसंख्येने माळी समाजबांधव, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.