तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला
जागीच ठार ,भादूर्णी येथिल घटना
मूल :- जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरूवारी सकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान बफर झोन क्षेत्रातील भादूर्णी क्रमांक दोन बिटातील कक्ष क्रमांक 324 मध्ये घडली.मृतकाचे नाव तुळशीदास सुरेश सोनूले, वय 35 ,रा.रत्नापूर असे आहे. चालू वर्षातील मूल तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.आत्तापर्यंत वाघाच्या हल्ल्यात तालुक्यातील सतरा जणांचा बळी गेलेला आहे. सध्या तेंदूपाने संकलनाचा हंगाम सुरू आहे. शेतीची कामे नसल्याने सकाळीच गावातील शेतकरी, शेतमजूर जंगलात जावून तेंदूपाने तोडण्याचे काम करतात. त्याचे पुडके बनवून तेंदूपाने संकलन करणा-या व्यापाराकडे ते दिले जाते. जंगलाशेजारी राहणा-या लोंकांचे तेंदूपाने संकलन हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. मूल तालुक्यातील रत्नापूर येथील रहिवासी तुळशीदास सुरेश सोनूले हा सकाळीच गावातील पंधरा ते वीस नागरिकांसोबत भादूर्णी क्रमांक दोन येथील जंगलात गेला होता.हे क्षेत्र बफर झोन मध्ये असून कक्ष क्रमांक 324 मध्ये येते.याठिकाणी वाघाचा मोठा संचार आहे.ठिकठिकाणी तेंदूपाने तोडण्याचे काम सुरू असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने तुळशीदासवर हल्ला केला.त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.तेंदूपाने तोडणा-या जवळपासच्या नागरिकांनी आरडाओरड केल्याने वाघाने जंगलात धुम ठोकली.तोपर्यंत तुळशीदास वाघाच्या हल्ल्यात ठार झालेला होता. घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी जंगलाकडे धाव घेतली.या घटनेने तेंदूपाने तोंडण्यासाठी जंगलात जाणा-या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.जंगलाशेजारी राहणा-या नागरिकांना तेंदपाने संकलनाचा हंगाम एक उदरनिर्वाहाचे साधन आहे. वाघाच्या हल्ल्यांमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच बफर झोन क्षेत्राचे मूल येथील वनपरिक्षेत्राधिकारी राहूल कोरेकर,मारोडा येथील क्षेत्र सहायक पाकेवार आणि वन कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. वनविभागातर्फे मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीची वीस हजार रूपयांची मदत करण्यात आली.मृतकास पत्नी,दोन मुली आणि एक मुलगा आहे. नुकतेच सिंदेवाही तालुक्यातील शिवणी क्षेत्रात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केले होते.तेदूपाने हंगामातील ही दुसरी घटना आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास वनविभाग करीत आहे.

गावातील नागरिकांनी सकाळी सकाळी जंगलात जावून तेंदूपाने संकलन करू नये असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.सकाळी वाघाच्या तथा इतर वन्यजीवांच्या मोठया हालचाली असतात.शिकारी साठी ते सक्रीय असतात.त्यामुळे हल्ला होण्याची मोठी शक्यता असते.