प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विदयालयाचा निकाल 98.41 टक्के निकाल
धनश्री पुरुषोत्तम समर्थ विद्यालयातुन प्रथम, तर सावली तालुक्यातून चौथी
निफंद्रा :- प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारा आयोजित एस.एस.सी मार्च 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये निफंद्रा येथील प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विदयालयाचा निकाल 98.41% लागला. दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली. परीक्षेला 43 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी प्राविण्यासह 11, प्रथम श्रेणीत 19, व्द्वितीय श्रेणित 10 पास झाले.
धनश्री पुरुषोत्तम समर्थ हि 91%गुण घेत विद्यालयातुन प्रथम, तर तालुक्यातून 4 थी आली.राज अशोक धुळसे 86.60%गुण घेत व्द्वितीय, तर दिपक किशोर नवघडे हा 83%गुण घेत तिसरा आला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनचे संस्थेंचे अध्यक्ष गजानन येनगंदलवार, सचिव रवींद्र आडेपवार,शाळेचे संस्थापक विजय आडेपवार, मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक पालक संघांचे पदाधिकारी यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.