रेल्वे समोर उडी मारून इसमाची आत्महत्या
मूल : धावत्या रेल्वे गाडी समोर उडी मारून एका विवाहित इसमाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी(दि.३) दुपारी १२ वाजता सुमारास घडली. बंडू नलुरवार (50) रा. मूल असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मूल येथील बंडू नलुरवार हा सकाळी घरून निघाला. मूल शहरापासून जवळपास ५ किमी अंतरावर असलेल्या सिंदेवाही मार्गावरील बेलघाटा गावाजवळील रेल्वे गेट जवळ आला.दरम्यान गोंदियाकडून चंद्रपूर कडे धावणाऱ्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली. बंडू नलुरवार आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
शहरातील कुणबी मोहल्ला वार्ड नंबर २ येथे राहणाऱ्या बंडू नलुरवार यांचे कपडे प्रेस करायचे छोटेशे दुकान होते.मात्र मिळणाऱ्या उतपन्नातून कुटुंबाचा गाडा हाकणे शक्य नसल्याने मागील दोन महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत होता.अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पुलिस दाखल होवून मृतदेह शविच्छेदनासाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.बंडूच्या दुर्दैवी मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.