सेवानिवृत्त वनमजूर दहा महिण्याच्या वेतनापासून वंचित
वरिष्ठांचा मनमानी कारभार
मूल :-सेवानिवृत्त बारमाही वनमजूर दहा महिण्याच्या वेतनापासून वंचित असल्याने त्यास आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.चिचपल्ली येथील प्रादेशिकच्या वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या मनमानी कारभाराचा फटका बसत असल्याचा आरोप होत आहे. वरिष्ठ अधिका-यांना वारंवार निवेदन देवूनही दुर्लक्ष करीत असल्याचे वनमजूराने म्हटले आहे. चिचपल्ली येथील प्रादेशिक वनपरिक्षेत्रात रविकिशोर गुलाब खोब्रागडे 1986 पासून बारमाही वनमजूर म्हणून कार्यरत होते.नियत वयोमानानुसार ते वयाच्या 60 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले. नोव्हेंबर 2021 मध्ये सेवानिवृत्त करायला पाहिजे होते.परंतु वनविभागाने त्यांना सेवानिवृत्ती बाबत 14-09-2022 ला पत्र पाठवून तुम्ही सेवानिवृत्त झाल्याचे सांगितले. नोव्हेंबर 2021 मध्ये पत्र न देता सप्टेंबर 2022 ला पत्र दिल्याने त्यांना धक्काच बसला.तब्बल सोळा महिण्यानंतर सेवानिवृत्तीबाबत त्यांना कळविले. तो पर्यंत त्यांच्या कडून काम करवून घेतले.मध्यंतरीच्या काळामध्ये वरिष्ठ वनाधिकारी यांनी सर्व वनमजूरांना तुम्ही रोजगार हमी योजनेतंर्गत काम करीत असल्याचे लिहून मागितले होते.परंतु वनमजूरांनी तसे लिहून देण्यास नकार दिला होता.वन विभागामध्ये वनमजूरांची सेवा जेष्ठता यांदी सुदधा आहे.परंतु वनविभाग आपलाच मनमानी कारभार करीत असल्याचे खोब्रागडे यांनी म्हटले आहे.1 डिसेंबर 2021 ते 14 सप्टेंबर 2022 पर्यंतचा दहा महिण्याचे वेतन देण्यात यावे ,अशी खोब्रागडे यांनी मागणी केली आहे.वारंवार वरिष्ठ वनाधिकारी यांच्या कडे निवेदन देवूनही त्याचे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.दहा महिण्याच्या वेतनाअभावी खोब्रागडे यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.