निराधार भावंडाना राष्ट्रवादीची शैक्षणिक मदत , तीन वर्षाकरिता घेतले दत्तक

48
निराधार भावंडाना राष्ट्रवादीची शैक्षणिक मदत
तीन वर्षाकरिता घेतले दत्तक
मूल :- आईवडीलांचे छत्र हरपलेल्या निराधार भावंडाना राष्ट्रवादीने शैक्षणिक मदत केली.एका रस्ता अपघातात आईवडीलांचा गडचिरोली जिल्हयात मृत्यू झाला होता. मूल तालुक्यातील टेकाडी येथिल संजय बालाजी जराते कुटुंबीय  पत्नी आणि आपल्या दोन मुलांसह गडचिरोली जिल्हयातील एकोडी या गावी राहत होते.लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.मतदान करून संजय जराते हे आपल्या पत्नीसह रोजगारासाठी दुचाकीने आंध्रप्रदेशात जात होते.रोजगारासाठी त्यांना भटकंती करावी लागत होती. मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करायचे.परंतु,नियतीने डाव साधला. अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला आणि पतीने उपचाराअंती आठ दिवसानंतर जगाचा निरोप घेतला.दाम्पत्याच्या  मृत्यूने चेतन आणि यश ही आठ आणि दहा वर्षाची दोन्ही लहान मूले  क्षणात निराधार झाली. दोन्ही मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी म्हाता-या आजी आजोबांवर येऊन पडली. ही घटना अजित पवार गटाच्या राष्टवादी कॉंग्रेस पक्षाला माहित होताच त्यांनी या दोन्ही भावंडाची जबाबदारी उचलली.तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी वर्धापन दिनाचे औचित्य साधून तीन वर्षाकरिता दोन्हा भावंडाना दत्तक घेतले. त्यांना टेकाडी येथे  एका छोटेखानी कार्यक्रमात दहा हजार रूपये रोख रक्कम  आणि शैक्षणिक साहित्य देवून त्यांना आधार दिला.दरवर्षी वर्धापन दिनाच्या दिवशी त्यांना रोख रक्कम आणि शैक्षणिक साहित्य दिल्या जाईल,असा निर्धार राष्टवादीचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी केला.यावेळी जराते भावंडाचे आजी आजोबा,शहर अध्यक्ष आकाश येसनकर,महिला शहर अध्यक्ष धाराताई मेश्राम,तालुका अध्यक्ष संगीता गेडाम,रजत कुकुडे,आनंदराव गोहणे,रोहीत कामडे,भोई समाजाचे अध्यक्ष तुकाराम गोहणे,ईश्वर जराते उपस्थित होते.