मूल मध्ये अवैध रेतीची सर्रास तस्करी
तालुका प्रशासनाचे डोळेझाक,नागरिकांची झोपमोड
लाखो रूपयांच्या महसुलावर पाणी
व्हिडीओ काढल्याने प्रशासन गंभीर नसल्याचे उघडकीस
मूल:- मूल मध्ये अवैध रेतीची सर्रास वाहतूक सुरू आहे.याकडे तालुका प्रशासनाचे अक्षम्य डोळेझाक होत आहे.शासनाच्या लाखो रूपयांच्या महसुलावर सुदधा पाणी फेरल्या जात आहे. एकप्रकारे अवैध रेतीच्या तस्करीला प्रशासनाचीच मुक संमती मिळत आहे. शहरातून अवैध रेंतीची वाहतूक रात्रभर सुरू राहत असल्याने नागरिकांना मोठया प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मूल मधील एका नागरिकांने सोमवारी रात्री रात्रभर चालणा-या अवैध रेतीच्या वाहतुकीचा व्हिडोओ काढून प्रशासनाची पोलखोल केली आहे. संबधित नागरिकांने हा व्हिडीओ महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन यांना पाठवून अवैध रेतीच्या वाहतुकीचा पुरावाच दिला आहे. रेती तस्करीच्या वाहतुकीचा व्हिडीओ काढल्याने प्रशासन अवैध रेतीविषयी गंभीर नसल्याचे उघडकीस आले आहे. दुर्लक्ष् शासनाच्या धोरणानुसार सर्वत्र रेती घाट बंद आहे.तरीही सर्वत्र रेतीची तस्करी मोठया प्रमाणात सुरू आहे.त्याला मूल तालुका सुदधा अपवाद नाही. तालुक्यात असलेल्या ठिकठिकाणच्या रेती घाटातून रात्रभर रेतीची अवैधरित्या तस्करी केल्या जात आहें. ही वाहतूक मोठया प्रमाणात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. चोरीच्या रेतीची साठवणूक ठिकठिकाणी होत आहे. प्रशासन मात्र हातावर हात देवून बसले आहे.मुक संमती असल्याचे बोलल्या जात आहे.अवैध रेतीच्या तस्करीवर आमची करडी नजर असल्याचे फक्त बोलल्या जात आहे.प्रत्यक्षात मात्र. कोणतीही कारवाई होत नसल्याने अवैध रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे. अवैध रेतीने मूल मधील उमा नदी नुसती पोखरली जात आहे. सोमनाथ मार्गावरील उमानदीच्या घाटातून अवैध रेतीची वाहतूक रात्रभर सुरू राहत असल्याने येथील मरार मोहल्ला ,मादगी मोहल्ला,मानी मोहल्ला, गोंड मोहल्ला,ढिवर मोहल्ला या परिसरातील नागरिकाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रात्रभर अवैध रेतीचे टॅक्टर या मार्गावरून धावत असल्याने ट्रक्टरच्या आवाजाने नागरिकांची झोपमोड होत आहे.लहान मुलेही कमालीचे त्रस्त झाले आहे. झोपमोड होत असल्याने नागरिकांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.या वार्डातील एका नागरिकाने रात्रभर चालणा-या या रेतीच्या तस्करीचा सोमवारी रात्री व्हिडीओ काढून प्रशासनाकडे पाठविला आहे.यावर महसूल आणि पोलिस प्रशासन कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.