आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त, योगामुळे त्वचारोग झाला नाहिसा, मानवी जीवनात योगाला अनन्यसाधारण महत्व

81
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त 
योगामुळे त्वचारोग झाला नाहिसा
मानवी जीवनात योगाला अनन्यसाधारण महत्व
मूलः- विनायक रेकलवार

मानवी जीवनामध्ये व्यायाम आणि योगाला फार महत्व आहे. योगामुळे आपल्याला निरोगी आणि उत्तम आरोग्य लाभू शकते. त्यासाठी नियमित योगा आणि योगासने करणे महत्वाचे आहे.योगामध्ये अनन्यसाधारण ताकद असते याची जाणीव येथिल एका सेवानिवृत्त शिक्षकाला झाला. लहानपणापासून असलेला त्यांच्यातील त्वचारोग योगामुळे नाहिसा झाला.त्याबरोबर त्यांनी आयुर्वेदीक औषधी सुरू ठेवली. त्वचा रोग आता पूर्णपणे बरा झालेल्या साठ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव अनिल गांगरेडडीवार असे आहे. गांगरेडडीवार सर आता मूल मध्ये योगा प्रशिक्षक म्हणून पूर्णवेळ काम करतात. अनिल गांगरेडडीवार यांना त्वचारोग हा जेनेटिक आजार होता.ठिकठिकाणी त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले.त्यात त्यांचा बराचशा पैसा  खर्च झाला.त्यातून त्यांना आराम मिळाला नाही. रोगही बरा झाला नाही. नागपूर येथे आयुर्वेदीक औषधोपचार करताना योगा विषयी माहिती मिळाली.त्यांनी हरिद्वार येथे रामदेवबाबा आश्रमात उपचार घेण्याचे ठरविले. याठिकाणी त्यांनी योगा आणि योगसनाचे धडे घेतले. सातत्यपूर्ण योगा, योगासन आणि प्राणायम मुळे त्यांच्यात बदल जाणवायला लागला. त्वचारोग हळूहळू नाहिसा होताना त्यांना दिसले.त्यामुळे त्यांनी 2008 पासून योगाला पूर्णपणे वाहून घेतले आहे. आजतागायत ते योगा करीत आहेत. तसेच इतरांना सुदधा योगा शिकवतात.डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण शरीर भर झालेला त्वचा रोग केवळ योगा मुळे पूर्णतः बरा झाल्याचे गांगरेडडीवार सर सांगतात. योगात खूप मोठी ताकद असल्याचे ते म्हणतात. ‘करो योग रहो निरोग‘ हे त्यानी सिदध करून दाखविले. वयाच्या साठाव्या वर्षी सुदधा  मूल मध्ये ते आज योगा प्रशिक्षक म्हणून काम करतात.त्यांनी निर्माण केलेल्या योगा समिती मध्ये त्यांच्याशी 250 च्या वर नागरीक जुळले आहेत. विविध प्रकारचे असलेले योगा, प्राणायम आणि योगासनाचे महत्व आणि  फायदे विशद करतात. पहाटे ब्रम्ह मुहूर्तावर येथील तालुका क्रीडा संकूलाच्या आवारात  योगाला सुरूवात होते.मागील पंचवीस वर्षापासून नित्यनेमाने त्यांचे योगाचे कार्य सुरू आहे.रोज दोन तास यासाठी ते देतात. अनिल गांगरेडडीवार सर गुरूदेव सेवा मंडळाशी सुदधा जुळले असल्याने ध्यान प्रार्थनावरही त्यांचा भर असतो.
” योगामध्ये खुप ताकद आहे.मला त्वचारोग झाला.माझा हा आजार जेनेटिक आजार आहे.खुप औषधोपचार केले.पण,फायदा झाला नाही. एका खासगी वाहिनीवरून योगाची माहिती मिळाली.आयुवेर्दीक औषधाबरोबर योगासनाला सुरूवात केली.त्यातून माझा त्वचारोग पूर्णपणे बरा झाला.ब्रम्हमुहूर्तावर योगासने केल्यास त्यातून शरीराला प्राणवायू मोठया प्रमाणात मिळते. – श्री.अनिल गांगरेडडीवार,योगा प्रशिक्षक,मूल.”