वीज साहित्याची चोरी,पंचवीस लाख रूपयांचे नुकसान
दीडशे विदयुत खांब पाडले
मूल :- येथिल महाराष्ट राज्य विदयुत वितरण कंपनी मर्यादित असलेल्या विदयुत खांबावरील अॅल्युमिनीयम तारांची चोरी झाली.त्यात महावितरणचे पंचवीस लाख रूपयाचे नुकसान झाले.ही चोरी मागिल सहा महिण्यांपासून होत होती.चोरांनी शेतातील जवळपास 150 सिंमेटचे खांब पाडले. या प्रकरणी येथिल महावितरण कंपनीने अठरा पोलिस तक्रार दाखल केले आहे.पीकांना पाणी देण्यासाठी शेतक-यांना वीजेची आवश्यकता आहे.मागणी नुसार महावितरण शेतक-यांना त्यांच्या शेतापर्यंत वीज पुरवठा करीत असते.यासाठी कृषी वाहिनीअंतर्गत, सिमेंटचे खांब उभारून अॅल्युमिनीयम तारांची जोडणी केली जाते. शेतातील मोकळया वातावरणाचा फायदा वीज साहित्याची चोरी करणा-या भामटयांनी उचलला.शेतात कोणी नसल्याचे पाहून चोरांनी सिमेंटचे खांब पाडून त्यातील अॅल्युमिनीयम वीज तारांची चोरी केली.ही वीज चोरी तालुक्यातील केळझर,टोलेवाही,उसराळा,कोसंबी,भेजगाव,चिखली,बेलगाटा,आणि मूल परिसरात झाली आहे.जवळपास आठ ते दहा किमी अंतराएवढे वीज तार चोरांनी लंपास केले आहे.ही चोरी जुलै 2023 पासून ते मे 2024 पर्यंत झाली आहे. याप्रकरणी,महावितरण कंपनीचे पंचवीस लाख रूप्यांचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.

याविषयी बोलताना महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया म्हणाले,कृषी वाहिण्यांसाठी असलेल्या वीज तार साहित्याच्या चोरी प्रकरणी मूल पोलिस ठाण्यात अठरा तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहे.जिल्हा पोलिस अधिक्षक यांनाही निवेदन सादर केलेले आहे.मूल पोलिसांनी बल्लारपूर येथिल एका आरोपीविरूदध गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली.
ं
ं