इमारत ठणठणीत असताना साडे चौदा लाख रूपये खर्च करण्याचे कारण काय?

164

ग्रामपंचायतला विश्वासात न घेता उपकेंद्राच्या दुरूस्तीचे काम
इमारत ठणठणीत असताना साडे चौदा लाख रूपये खर्च करण्याचे कारण काय?
मूल :- ग्रामपंचायतला विश्वासात न घेता चिमढा येथील आरोग्य उपकेंद्राच्या दुरूस्तीचे काम केल्या जात आहे.उपकेंद्राचे बांधकाम सुव्यवस्थित आणि ठणठणीत असताना साडे चौदा लाख रूपये खर्च करण्याचे कारण काय ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.याबाबत चिमढा येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन चौधरी यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे. चौकशी करून संबंधित अधिका-यांविरूदध कारवाईची मागणी केली आहे. चिमढा येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीची दुरूस्ती सन 2016-2017 मध्ये झालेली होती.त्यासाठी दहा लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात आलेला होता.असे असताना 2023-24 मध्ये मूल येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या वतीने इमारतीच्या दुरूस्तीसाठी साडे चौदा लाख रूपये खर्च करण्याचे कारण काय ? असा प्रश्न गजानन चौधरी यांनी उपस्थित केला आहे. कोणतीही इमारत पाच वर्षाच्या कालावधीमध्ये खराब होत नाही. सदर इमारत ठणठणीत आहे.निर्लैखित झालेली नाही. इमारत दुरूस्ती बाबत कोणाची मागणी सुदधा नाही. ंअसे असताना ग्रामपंचायतच्या ठरावाविना दुरूस्ती करण्याचे कारण काय?याविषयी मनात शंकेची पाल चुकचुकत असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. उपकेंद्र ग्रामपंचायतच्या हद्यीत असल्याने त्याआधी ग्रामपंचायतचा ठराव घेणे आवश्यक आहे.इमारत दुरूस्ती संदर्भात ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये अशा पदधतीचा कोणताही विषय आला नाही आणि ठराव सुदधा झालेला नाही.त्यामुळे ग्रामपंचायतला विश्वासात न घेता सदर बांधकाम सुरू असल्याने यात भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्या जात असल्याचे म्हटले आहे.याबाबत चौकशी करून संबंधित अधिका-यांविरूदध कारवाई करावी अशी मागणी चिमढा येथिल सामाजिक कार्यकर्ते गजानन चौधरी यांनी केली आहे.