क्षुल्लक कारणावरून शेजा-याचा कु-हाडीने खून

18
क्षुल्लक कारणावरून शेजा-याचा कु-हाडीने खून
आरोपी ताब्यात,हळदी मध्ये खळबळ
मूल
 :- क्षुल्लक कारणावरून शेजा-याचा कु-हाडीने मानेवर वार करून खून करण्यात आला.ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान तालुक्यातील हळदी येथे घडली.या प्रकरणी,पोलिसांनी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.या घटनेने हळदी येथे खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव राजू शेषराव बोदलकर वय 30 वर्षे असे आहे.
मूल पासून आठ किमी अंतरावर हळदी हे संवेदनशिल गाव आहे.येथे मृतकाचे आणि आरोपीचे घर आमनेसामने आहे.मृतकाच्या  घरा जवळून विदयुत वायर गेलेले आहे. ते वायर बाजूला करून दुस-या ठिकाणावरून नेण्याची विनंती केली.  त्याच कारणावरून शेजारील इसम आणि राजू यांच्यात शाब्दीक वाद झाला. हा वाद सुरू असताना शेजारी झाडाच्या फांदया तोडणा-या पोराने ऐकला आणि राजूच्या घराजवळ येवून रागाच्या भरात हातातील कु-हाडीने  राजूच्या मानेवर सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केला.रक्ताच्या थारोळयात पडलेल्या राजूचा  घटनास्थळीच मृत्यू झाला.ही घटना वा-या सारखी पसरताच गावात एकच खळबळ उडाली.घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. राजू हा गावात अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचा होता.त्याला पत्नी ,एक मुलगा आणि एक मुलगी आहे. याप्रकरणी,हळदी येथील सुरज गुरूदास पिपरे वय 21 आणि गुरूदास नकटू पिपरे ,अंदाजे वय 50 वर्षे या बापलेकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुमित परतेकी हे करीत आहे.घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी भेट दिली. या घटनेने हळदी  गावात तणावपूर्ण वातावरण पसरले आहे.