पिकविम्याचे 112 कोटी रूपये पासून चंद्रपूर जिल्हा वंचित

262
पिकविम्याचे 112 कोटी रूपये पासून चंद्रपूर जिल्हा वंचित
मूल :- चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांना सन 2023 अंतर्गत पिकविमासाठी असलेला 112 कोटी रूप्यांचा निधी अजूनही मिळालेला नसल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य प्रकाश पाटिल मारकवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.खरीप हंगाम 2023 मध्ये पीकविमा योजनेसाठी चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांनी नुकसान भरपाई साठी अर्ज सादर केले होते.या हंगामात धान ,कापूस आणि सोयाबिन या पिकाचे अवकाळी पाऊस तसेच रोगराई मुळे प्रचंड नुकसान झाले होते.ओरीयन्टल इन्शुरस कंपनीने शेतक-यांचा पिक विमा उतरविलेला होता.नवीन हंगामाला सुरूवात झाल्यानंतरही पिकविम्यासाठी असलेले 112 कोटी रूप्ये अजूनही शेतक-यांना मिळालेले नसल्याचे मारकवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.चालू हंगामात  शेतक-यांना पैसाची नितांत आवश्यकता भासत आहे.पैसा अभावी शेतकरी आर्थिक चणचणीत सापडला आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शेती करायची कशी हा प्रश्न शेतक-यांपुढे निर्माण झाला आहे.चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांना तात्काळ पिकविम्याची रक्कम उपलब्ध करून दयावी अशी मागणी प्रकाश मारकवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.