कवठी ते सावली मार्गावर रानडुकराचा धुमाकूळ
रानडुक्कराच्या हल्ल्यात 1 ठार :6 जखमी
मूल :-सावली शहरात आज एका पिसाळलेल्या रानडुक्कराने धुमाकूळ घातला. रानडुक्कराने केलेल्या हल्ल्यात 1 ठार तर 6 जखमी झाले.या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. यात कवठी येथील तीन विद्यार्थीनी जखमी झाले आहे. या घटनेने विद्यार्थी- विद्यार्थीनीं मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास पिसाळलेल्या रानडुक्कराने कवठी वरून सावली ला येणाऱ्या विद्यार्थ्यांवर सावली जवळील मोठ्या तलाव रोड वर हल्ला केला त्यात तनु नायबनकार रा.कवठी, केसवी पाल रा कवठी, दुर्गा दहेलकर रा.कवठी या शाळकरी मुली जखमी झाल्या. त्यानंतर तो रानडुक्कर सावली शहराच्या दिशेने जावून प्रभाग 14 मध्ये आकुलवार यांच्या घरामागे येवून त्यांनी शेतात जाण्याच्या तयारीत असलेले शेतकरी सुरेश आकुलवार वय 55 ,पत्नी निर्मला आकुलवार वय 50 व मुलगा स्वप्नील सुरेश आकुलवार वय 30 वर्ष यांच्या वर हल्ला करीत गंभीर जखमी केले व नंतर तो रानडुक्कर हा पंचायत समिती च्या समोर शेतात काम करीत असलेल्या शेतकरी आनंदराव चौधरी या शेतकऱ्यावर जोरदार हल्ला केला. काही जणांनी त्या रानटी डुक्कराला हाकलले त्यात नंतर गंभीर जखमी झालेल्या आंनदराव चौधरी ला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले त्यानंतर गडचिरोली ला भरती करण्यासाठी जात असतांनाच त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात ऐकून 6 जण जखमी झाले असून 3 जणांना गडचिरोली येथे भरती करण्यात आले या संदर्भात वनविभाग ला माहिती देण्यात आली आहे.सदर घटनेने खळबळ माजली असून त्या पिसाळलेल्या रानडुक्कर चा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.