जनावरे कोंबून नेणा-या ट्रकचा अपघात , कत्तलीसाठी नेत असल्याचा अंदाज

28
जनावरे कोंबून नेणा-या ट्रकचा अपघात
कत्तलीसाठी नेत असल्याचा अंदाज
मूल
 :- जनावरे कोंबून नेणा-या छत्तीसगडच्या ट्रकला मूल जवळ अपघात झाला.ही घटना बुधवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान येथे घडली.या अपघातात ट्र्रक मधील सोळा जनावरे मृत्यमुखी पडली.तर,इतर जनावरे इतरत्र पळाली.अपघातानंतर ट्रक चालका सह इतर आरोपी फरार झाले. जनावरे गडचिरोली मधून हैद्राबादला कत्तलीसाठी नेल्या जात होते,अशी शंका वर्तविली जात आहे. मूल पासून चार किमी अंतरावर असलेल्या आकापूर वळणावर सीजी 07 -सीबी 0717 या क्रमांकाचा ट्रक उलटला.या ट्रक मध्ये अंदाजे 30 ते 35 जनावरे अंदाजे कोंबून होती. ट्रक उलटल्यामुळे येथील सोळा जनावरे ट्रक खाली सापडून मृत्यमुखी पडली. तर ,  इतर जनावरे इतरत्र पळाली. अपघातानंतर ट्रक चालक आणि इतर साथीदार फरार झाले. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाल्यामुळे जनावरांविषयी शंका बळावली.ही जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत होती  काय ? याविषयी पोलिस तपास करीत आहे. ट्रक छत्तीसगड येथील असून जनावरे गडचिरोली जिल्हयातील असल्याचे बोलल्या जात आहे.मृत्यमुखी पडलेल्या सर्वच जनावरांचे शवविच्छेदन करण्यात आले. फरार झालेल्या ट्रक चालकाचा आणि इतर साथिदारांचा शोध मूल पोलिस करीत आहे.याबाबत पुढील तपास पोलिस निरिक्षक सुमीत परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलिस करीत आहे.