मूल मध्ये संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

207
मूल मध्ये संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले
उमा नदी नाले दुथडी
धान शेती पाण्याखाली
मुख्य मार्गासह ग्रामिणचे मार्ग बंद
मूल येथील स्मशानभूमी मार्गावर उमा नदीचे पाणी असल्याने अंत्यसंस्कार करावे लागले चिचाळा येथे

मूल:- दोन दिवसांपासून असलेल्या संततधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले.अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले. येथील उमा नदी आणि नाले दुथडी भरून वाहू लागले आहे.नदीचे आणि पावसाचे पाण्यामुळे तालुक्यातील धान शेती पाण्याखाली आली.उमा नदीच्या काठावरील धान उत्पादक शेतक-यांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे.शेत बांध्यामध्ये सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. उमा नदी आणि अंधारी नदीच्या पुलावरून पाणी असल्याने   मूल वरून जाणारे मार्ग बंद झाले आहे.चंद्रपूर ,सावली ,गडचिरोली या मुख्य मार्गासह ग्रामिण भागातील मार्ग बंद झाले आहे.सर्वत्र आलेल्या पुरसदृश्य परिस्थिती मुळे तालुक्यात चोहीकडे पाणीच पाणी दिसत होते.उमा नदी दुथडी भरून वाहत असल्याने चिचाळा गावातील शेत बांध्यामध्ये पाणीच पाणी जमा झाले. चिचाळा ते फिस्कुटी मार्ग बंद झाला. संततधार पावसामुळे धान उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.ज्या ठिकाणी रोवणी झाली त्याठिकाणचे धान रोपे वाहून गेले असल्याचे शेतक-यांनी सांगितले. उमा नदी काठावर असलेल्या स्मशानभूमी मार्गावर पाणी असल्याने मूल येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नरंेद गरपल्लीवार यांच्या वरील अंत्यसंस्कार चिचाळा येथील स्मशानभूमीत करावे लागले. मूल ते चंद्रपूर जाणारे मार्गावरील आगळी जवळील तलाव भरल्याने रोडवर पाणी आल्यामुळे  मार्ग बंद आहेए त्यानंतर अंधारी नदी वरून पाणी वाहत असल्यामुळे पूर्ण वाहतूक बंद आहे. जाणाळा ते सुशी जाणारा मार्गा वरील चीरोली जवळील अंधारे नदी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद आहे .मारोडा ते भादुर्णा ला जाणारे रोडवरील नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे मार्ग बंद आहे .मुल ते करवण काटवण जाणारे रोडवरील रेल्वे बोगदया मध्ये पाणी भरल्याने मार्ग बंद आहे. मूल ते सावली जाणारे रोडवरील आक्कापर गावाजवळी ल नाल्यावर उमा नदीचे पुरा मुळे  तीन ते चार फूट पाणी वाढल्यामुळे मार्ग बंद आहे .मौजा मूल येथील रामपूर वार्डात घरात पुराचे पाणी घुसले आहेत . राजोली ते पेडगाव जाणारे रोड वरील गावाजवळ नाल्यावर पाणी वाहत असल्यामुळे पेटगाव जाणारा मार्ग बंद झाले आहे.मुल ते राजोली ब्रह्मपुरी जाणारे रोडवरील उमा नदीचे समोरील पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद झालं आहे.  पूर परिस्थिती वर प्रशासन लक्ष ठेवून आहे.ठिक ठिकाणी योग्य बंदोबस्त लावण्यात आले आहे.