दाबगाव मामा तलावाची पाळ फुटल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली , तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली शेतात जाऊन पाहणी व चर्चा

29

दाबगाव मामा तलावाची पाळ फुटल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली शेतात जाऊन पाहणी व चर्चा

मुल – गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने मुल तालुक्यातील दाबगाव तलावात क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा साचल्याने जंगलालगत असलेल्या मामा तलावाची मोठी पाळ फुटल्याने तलावातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतातून वाहत गेल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली. अनेकांचे खरीप पिक धानाचे रोवणे वाहून गेले. पऱ्हे, आवत्यां वाहून गेले. शेकडो हेक्टर शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे. तलावाखाली लागून असलेला गरीब शेतकरी महादेव थरकर व रत्नमाला थेरकर या शेतकऱ्यांच्या सात एकर शेतीत पूर्ण रेती साचलेली आहे.पाळी फुटून गेले,यावर्षीचे पूर्ण पीक वाया गेल्याने शेतातील रेतीचा पूर्ण उपसा केल्याशिवाय पुढील वर्षी शेती कसण्यासाठी कमी येणार नाही. असे कांग्रेस कमिटीच्या पदाधिकारी यांना सांगताना धसाधस रडायला लागला.किंबहुना मी वाचून का करु आताच तुमच्यासमोर आत्महत्या करतो म्हणत पाण्याकडे जायला निघाला तेवढ्यात कांग्रेस पदाधिकारी यांनी त्याला रोकुन हिम्मत दिली. उपस्थित असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या नुकसान बाबत चर्चा केली. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर काँग्रेसचे नेते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोशसिंह रावत यांचे मार्गदर्शनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, जिल्हा काँग्रेसचे महासचिव घनश्याम येनुरकर,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर घडसे यांनी शेतीवर जाऊन नुकसान ग्रस्त शेकऱ्यांसमोर सभापती राकेश रत्नावार व अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम व तहसीलदार मृदुला मोरे यांचेशी फोनवर बोलून समस्या मांडली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे निवेदन आपल्याकडे देऊन चर्चा करणार असे सांगितले. याप्रसंगी दाबगाव उपसरपंच अतुल बुरांडे, यांचेसह तलावाच्या पाण्याखाली ज्या शेतकऱ्यांची शेती आली व नुकसान झाली असे सर्वच शेतकरी बांधव व गावातील अन्य शेतकरी उपस्थित होते.