सुरकर विदयालयात शालेय मंत्रीमंडळाची स्थापना
मूल :- कवठी येथील शहीद सुरेश पाटिल सुरकर विदयालयात शालेय मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली.मुख्यमंत्री म्हणून दोन विदयार्थ्यांची निवड करण्यात आली.लोकशाही भारतातील निवडणूक प्रक्रियेची माहिती सर्व विदयार्थ्यांना व्हावी या उददेशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यात सर्व विदयार्थ्यांनी हिरीरीने भाग घेतला.ही निवडणूक प्रक्रिया मुख्याध्यापक के.व्ही.खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. मुख्यमंत्री पदासाठी मुलांमधून दोन विदयार्थी रिंगणात होते.तर मुलींमधून चार विदयार्थीनी रिंगणात होत्या.त्यातून मुलांमधून नितिन सुधीर पिटटलवार याची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.मुलींमधून खुशी प्रमोद फाले हिची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. मंत्रीमंडळामध्ये चैताली भगत – सांस्कृतिक मंत्री,टिनू घोटेकार-पर्यावरण मंत्री,मोहित भोयर-अर्थ मंत्री,गुलछन चिताडे-कृषीमंत्री,यामिना नायबनकार-स्वच्छता मंत्री,आरोषी रामगोनवार-आरोग्य मंत्री,तन्मय गेडाम- अन्न व पुरवठा मंत्री,शंतनू घोटेकार-वन मंत्री,भारती येनगंटीवार-शिक्षण मंत्री,वैष्णवी देशमूख-महसूल मंत्री ,मयूर नायबनकार-वाहतूक मंत्री,कुणाल भोयर-क्रीडा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. या सर्व विदयार्थ्यांना खाते वाटप करण्यात आले.शपथ विधी घेण्यात आला. मंत्रीमंडळाचे कार्य, खात्याचे महत्व आणि अधिनियमांची माहिती देण्यात आली. निवडणूक प्रक्रियेसाठी शाळेचे सहा.शिक्षक व्हि.डी.हजारे,वि.ओ.रेकलवार,एम.एन.डोंगरे,कु.एल.के.सलामे आणि लक्ष्मण तांगडे,जयंत वनकर,अनिल ठाकूर,सुनिल टेप्पलवार,श्रीमती गीता अर्जूनकार या शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी सहकार्य केले. शालेय मंत्रीमडळास शहीद सुरेश पाटिल सुरकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तुकाराम पाटिल सुरकर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच विदयालयात वर्गनायक आणि वर्गनायिकेची निवड करण्यात आली.