चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा विजय सिदधावार याना पुरस्कार

131
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा विजय सिदधावार याना पुरस्कार
शोध पत्रकारिता डिजीटल(पोर्टल) विभागातील पुरस्काराचे मानकरी
मूलः
– चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा शोध पत्रकारिता डिजीटल (पोर्टल) पुरस्कार येथिल जेष्ठ पत्रकार आणि पब्लिक पंचनामाचे मुख्य संपादक विजय सिदधावार यांना मिळाला. चंद्रपूर जिल्हयातील पत्रकारांसाठी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शोध पत्रकारिता डिजीटल (पोर्टल) विभागातील स्पर्धेमध्ये विजय सिदधावार यांनी सहभाग घेतला होता.त्यात त्यांच्या पब्लिक पंचनामा या पोर्टल मध्ये प्रसिदध झालेल्या बातमीची दखल घेण्यात आली. ते स्व.रामकुंवर सिंह यांच्या स्मृती  प्रित्यर्थ के.के.सिंह यांचे कडून देण्यात येणा-या पुरस्काराचे मानकरी ठरले. रविवारी  आयोजीत करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळयात विजय सिदधावार यांना आ.किशोर जोरगेवार यांच्या  हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण संमारंभ चंद्रपूर येथिल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे मा.सा.कन्नमवार सभागृहात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी  पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार , प्रमूख मार्गदर्शक म्हणून हितवाद नागपूरचे वरिष्ठ उपसंपादक कार्तिक लोखंडे,आ.किशोर जोरगेवार,चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर,सचिव प्रविण बतकी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
डिजीटल पोर्टल क्षेत्रामध्ये विजय सिदधावार हे मागिल वीस वर्षांपासून काम करीत आहेत. आपल्या पब्लिक पंचनामा  या पोर्टल मध्ये त्यांनी अनेक बातम्यांना न्याय मिळवून दिला आहे.विविध क्षेत्रातील बातम्यांवर त्यानीं प्रकाश टाकला आहे.मागिल चाळीस वर्षांपासून विजय सिदधावार पत्रकारिता ,क्षेत्रामध्ये आहे.नागपूर वरून प्रसिदध होणा-या नागपूर पत्रिका या वर्तमानपत्रापासून सिदधावार यांनी पत्रकारितेला सुरूवात केली.त्यानंतर लोकसत्ता या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी मूल वार्ताहर म्हणून काम पाहिले. तसेच सिदधावार यानी स्वतःचे प्रबोधन नावाचे मासिक काढले होते.त्यांचे पब्लिक पंचनामा हे साप्ताहिक आजही सुरू आहे. तसेच याच नावाने पोर्टल सुरू करून सिदधावार यांनी डिजीटल क्षेत्रात पाऊल ठेवले. पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीमध्ये विजय सिदधावार यांचे भरीव योगदान आहे. श्रमिक एल्गार या संघटनेच्या माध्यमातून सिदधावार यांचे चळवळीतील कार्ये वाखाणण्याजोगे आहे.चळवळीच्या आणि पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. पोर्टल क्षेत्रातील वेब पत्रकारितेसाठी विजय सिदधावार आजही अनेकांना मार्गदर्शन करीत आहेत.चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार हा प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जातो.या आधीही त्यांना श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार मिळालेला आहे. ते मूल येथिल नवभारत विदयालयात सहा.शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

डिजीटल क्षेत्रातील मिळालेल्या  शोध पत्रकारिता पुरस्कारासाठी जनतेचा आवाज या न्यूज पोर्टल परिवारातर्फे  विजय सिदधावार यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…!!