धानाच्या शेतीत साडेबारा फुट लांबीचा अजगर

27
धानाच्या शेतीत साडेबारा फुट लांबीचा अजगर
मूल :- तालुक्यातील भंजाळी येथे धानाच्या शेतीत साडेबारा फुट लांबीचा अजगर आढळून आला. शेतात रोवणीचे काम सुरू असताना येथील महिलांना अजगर दिसून आला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. सर्पमित्र उमेशसिंह झिरे आणि त्यांच्या चमूने अजगरास मोठया शिताफीने पकडले. मूल तालुक्यातील भंजाळी येथील शेतकरी मनिष भांडेकर यांच्या शेतात धान पीकाच्या रोवणीचे काम सुरू आहे. गावातील महिला रोवणीचे कामात गुंतल्या असताना त्यांना शेतीच्या बांध्यावर एक अजगर निदर्शनास पडला.अतिशय घाबरलेल्या महिलांनी ही माहिती शेतमालकास दिली.भांडेकर यांनी मूल येथील संजीवन पर्यावरण संस्थेच अध्यक्ष तथा सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांना सांगितली.त्यांनी तातडीने संस्थेच सदस्य अंकूश वाणी याला सोबत घेऊन भंजाळी गाव गाठले.तसेच पोंभूर्णा येथील वनरक्षक विनोद कस्तूरे यांना माहिती दिली.त्यांनी दोन युवकांच्या मदतीने अजगरास मोठया शिताफीने पकडले. अजगराची लांबी साडेबारा फुट असून तो तीस किलो वजनाचा आहे. अजगरास पकडल्याने रोवणीच्या कामावरील महिला आणि गावकरी भयमुक्त झाले.