वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी
बोरचांदली येथील घटना, मूल तालुक्यात वाघाचे हल्ले वाढले
मूल :- तालुक्यातील बोरचांदली येथे वाघाच्या हल्यात गुराखी गंभीर जखमी झाला.जखमी गुराख्याचे नाव विनोद भाऊजी बोलीवार वय 36 वर्षे असे आहे.ही घटना सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास सादागड बीटातील कम्पार्टमेंट नंबर 1800 मध्ये घडली. मूल तालुक्यातील हा परिसर सावली वनपरिक्षेत्रातंर्गत येतो. बोरचांदली येथील विनोद भाऊजी बोलीवार हे उमा नदीच्या परिसरात गावातील जनावरे चराई साठी घेऊन गेले होते.त्यांच्या सोबतीला गावातील इतर दोन तीन गुराखी होते.जनावरे परिसरात चराई करीत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने बोलीवार यांच्यावर झडप घातली. आधीच सावध झालेल्या बोलीवार यांनी वाघाचा हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला. सोबतीला जवळपास उभे असलेल्या इतर गुराख्यांनी आरडाओरड केल्याने वाघाने नदी पलिकडे धुम ठोकली. त्यामुळे गुराख्याचा जीव वाचला. ही घटना गावात माहित होताच गावक-यांनी चराई क्षेत्रात धाव घेतली. तसेच माहिती सावली वनपरिक्षेत्र कार्यालयास कळविण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या बोलीवार यांना तातडीने दुचाकी वर बसवून मूल येथिल उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. पुढील तपास सादागड बीटचे वनरक्षक लंकेश आघाडे हे करीत आहेत. मूल तालुक्यातील ही एका पाठोपाठ दुसरी घटना आहे.केळझर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाला होता.तर दुसरी घटना बोरचांदली येथे झाली.वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावक-यांनी केली आहे.याआधी वाघाने बोरचांदली मार्गावरील राजगड येथील डोंगरीवर आपले बस्थान मांडले होते.फिस्कुटी ते राजगड असा त्याचा भ्रमंती मार्ग तयार झाला होता.उमा नदीच्या परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याने शेतक-यांमध्ये आणि गुराख्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.