शिवसेना  तर्फे श्रद्धांजली कार्यक्रम 

105

शिवसेना  तर्फे श्रद्धांजली कार्यक्रम

मूल :- येथील शहरातील गांधी चौक येथे बुधवारी रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांचे मार्गर्दशनात शिवसेना तालुका मूल चे वतीने श्रद्धांजलि कार्यक्रम तथा निषेध कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरीरिक तथा डॉक्टर आणि मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष तथा सर्व सदस्य वा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी -कार्यकर्ते यांचे उपस्थिति श्रद्धांजलि कार्यक्रम तथा निषेध कार्यक्रम पार पड़ला.यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना मुल चे नामवंत डॉक्टर चौधरी सर यानी देश्यात जे कृत्य घड़त आहेत त्याचा डॉक्टर असोसिएशन मूल च्य वतीनें निषेध करित अश्या कृत्याना कधिच समर्थन करनार नाही असे यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी आपले मार्गदर्शनात शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यानी वारंवार महिलेवर होत असलेले स्त्रि अत्याचार,अमानवीय लैंगिक छळ या संपुर्ण समाज घातकी कृत्यांना आळा घालण्यासाठी आता जनतेनिच एकत्र येऊन रस्त्यावर उतरूण न्याय मिळवावा लागत आहे,बदलापूर ठाणे येथे ४ वर्षीय लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारा-विरोधात तसेच कोलकत्ता येथे महिला डॉक्टर. वर अमानुष पणे बलात्कार करून खून करणाऱ्या अश्या नराधमा ला फाशी दया अशी मागणी यावेळी करण्यात्त आली. यावेळी डॉ. वराडे सर डॉ.अजीम सर,डॉ. लाडे सर, डॉ.वाशिम सर, श्री साई मेडिकलचे मनीष एलटीवार, चालक-मालक संघटनेचे काजू भाऊ खोब्रागडे,श्याम भाऊ उराडे,सामाजीक कार्यकर्ते गौरव शामकुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी
युवासेना शहरप्रमुख अमित आयालाणी,शहर प्रमुख बादल करपे (प्रभार) रितिक मेश्राम विभाग प्रमुख,शिवम चलावार,संदीप निकुरे,शिवा कु,अमित मडावी,
सुनील काळे सौरव गिरडकर आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने मुल शहर वासिय जनता उपस्थित होती!