जाळयात अडकलेल्या अजगराला जीवदान
फिस्कुटी येथील घटना, पुरामुळे अजगर शेतशिवारात
मूल :- जाळयात अडकलेल्या अजगराला सर्पमित्रांंनी जीवदान दिले.ही घटना रविवारी सकाळी तालुक्यातील फिस्कुटी येथे घडली.अजगराला पकडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.फिस्कुटी येथे चार दिवसाच्या आधी मच्छिमारांच्या जाळयात अजगर अडकला होता. अतिवृष्टीमुळे उमा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदी काठावरील अजगर शेतशिवारात आणि गावात सापडत आहेत.फिस्कुटी येथील महेश शेंडे यांच्या घरालगतच्या शेताजवळ दोरीचे जाळे लावून होते.त्यात अजगर अडकल्याची माहिती मूल येथील वन्यजीव अभ्यासक आणि सर्पमित्र उमेश झिरे यांना मिळाली.त्यांनी लगेच आपल्या रेस्क्यू टिमसह फिस्कुटी गाठून जाळयात अडकलेल्या अजगराला अलगदपणे पकडले. अजगराला पकडल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.ही सर्व कार्यवाही संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे,पंकज उजवने,रितेश पिजदूरकर,दिनेश खेवले,ओम पाल,हौशीक मंगर,फिस्कुटीचे सरपंच नितिन गुरनूले यांनी केली.
अजगराची माहिती
अजगर हा जगात वावरणारा सर्वांत मोठा सरपटणारा बिनविषारी सर्प आहे.सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो.जगाच्या विविध भागात अजगराच्या अनेक जाती आढळतात.नदी काठावर,घनदाट वनात,झाडावर,तसेच खडकाळ जमिनीवरही यांचा वावर असतो.साप आणि अजगर यांच्या मध्ये फरक आहे.

पुरामुळे अजगर शेतशिवारात
सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे मूल वरून धावणारी उमा नदी दुथडी भरून वाहत आहे.जुलै महिण्यात आणि ऑगस्टच्या सुरूवातीला दोनदा उमा नदीला पूर आला.त्यामुळे उमा नदीच्या पाण्याची पातळी कमी झालेली नाही. नदीकाठावरील बिळात राहणा-या अजगरांना याचा मोठा धोका निर्माण झाला.बिळात पाणी घुसल्याने आणि प्रसंगी त्यांचे बीळ पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने अजगरांनी शेतशिवाराचा रस्ता धरला.त्यामुळे तालुक्यात सर्वत्र अजगर शेतशिवारात आणि तलावाच्या पाण्यात तसेच गावात सापडल्याची नोंद होत आहे.मागील वर्षी 50 अजगरांना सुरूक्षितपणे पकडून त्यांना वनविभागाच्या माध्यमातून जंगलात सोडल्याचे येथील सर्पमित्र उमेश झिरे यांनी सांगितले.या वर्षी पावसाळी वातावरणात जवळपास पाच ते सहा अजगर पकडल्याचे ते म्हणाले.