बापरे..! बारा फुटाचा अजगर शेतात
चार दिवसांत तीन अजगरांना पकडले
मूल :- तालुक्यातील चिचाळा येथे सर्पमित्रांनी बारा फुट लांबीचा अजगर पकडला. भल्ला मोठा अजगर पाहून उपस्थितांची भंबेरी उडाली.चिचाळा येथील शेतकरी बंडूजी धोडरे हे आपल्या शेतात धानाला पाणी करीत असताना त्यांना अजगर आढळला. एवढा मोठा साप पाहून त्यांची बोबडीच उडाली. शेतात अजगर असल्याची माहिती गावातही पसरली.शेतकरी धोडरे यांनी तात्काळ मूल येथील सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांना माहिती दिली.झिरे यांनी आपल्या संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना सोबत घेवून रेस्क्यू ऑपरेशन राबविले.शेतातील पिकात लपलेल्या अजगराला मोठया शिताफीने आपल्या सदस्याच्या मदतीने त्यांनी पकडले. अजगराला सुरूक्षितपणे पकडण्यात आल्याने गावक-यांनी आणि शेतक-यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. उमा नदीच्या काठावरील गावांमध्ये सध्या अजगराचा धुमाकूळ सुरू आहे.पुराच्या पाण्यामुळे अजगर शेतशिवारात ठाण मांडून बसत असल्याने शेतकरी वर्गामध्ये आणि शेतात काम करणा-या महिला मजूर वर्गांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मूल तालुक्यात चार दिवसांत तीन अजगराला पकडण्यात यश आले आहे.रविवारी फिस्कूटी येथे शेतशिवारात अजगराला सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांनी पकडले होते.याआधी मच्छिमारांच्या जाळयात अजगर अडकला होता.