चिरोली येथे एकाच दिवशी पाच दुकाने फोडली
अज्ञात आरोपी पसार,तपास सुरू,गावात खळबळ
मूल :- तालुक्यातील चिरोली येथे एकाच दिवशी देशी दारूच्या दुकानासह चार दुकाने फोडली.ही घटना सोमवारच्या रात्री येथे घडली आणि मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी,आरोपी अज्ञात असून त्यांचे विरूदध मूल पोलिस ठाण्यात गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. दुकानातील रोख रक्कम घेवून आरोपी पसार झाले. आरोपींचा मूल पोलिस शोध घेत आहे.पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,चिरोली बीटा अंतर्गत येणा-या चिरोली ते केळझर फाटयाजवळ ही चारही दुकाने आहेत. चिरोली येथील सत्यजीत कुंभारे यांचे किराणा सामानाचे दुकान आहे.त्यांच्या दुकानातून 7000 रूपये रोख घेवून आरोपी पसार झाले.त्यानंतर कुमार टेभूर्णे यांचे हॉटेल आहे.हॉटेल मधून 600 रूपये ,मंगेश येलमलवार यांच्या चायनीजच्या दुकानातून 700 रूपये, रविंद्र बोपनवार यांच्या फोटोग्राफी दुकानातून 150 रूपये आणि देशी दारूच्या दुकानातून 7000 रूपये घेवून आरोपी पसार झाले.आरोपींचा फक्त रोख रक्कम चोरण्याचा उददेश असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.त्यांनी दुकानातील इतर कोणत्याही वस्तूंना हात लावलेला नाही.तसेच देशी दारूच्या दुकानातील दारूच्या पेटया सुदधा व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले. वेगळयाच उददेशाने या भागात आलेले हे आरोपी असावे असा पोलिसांचा संशय असून आरोपी अटटल चोर नसावे असा त्यांचा अंदाज आहे.त्यादिशने पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. एकाच दिवशी चिरोली येथे पाच दुकाने फोडल्याने गावात खळबळ उडाली आहे.तथा गावक-यांमध्ये भितीचे वातावरण आहे. दुकाने फोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.अज्ञात आरोपींविरूदध मूल पोलिस ठाण्यात घरफोडी कलमा अंतर्गत गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सुमीत परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली चिरोली बिटातील पोलिस हवालदार पुंडलिक परचाके हे करीत आहेत.
मंगळवारी सकाळी पाचही दुकानदार आपआपले दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा चोरीची झाल्याची घटना उघडकीस आली. त्यांना दुकानाच्या शटरचे कुलूप फोडलेले आढळले.तसेच तिजोरीतील रोख रक्कम गायब असल्याचे दिसले.तात्काळ चिरोली पोलिस चौकीला माहिती दिली.