आज दरार तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन

34
दरार तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन
मूल :- येथिल दरार दुर्गा मंडळाच्या वतीने  बाल गोपालांसाठी दरार तान्हा पोळा उत्सवाचे  आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही तान्हा पोळा उत्सव भव्य स्वरूपात असणार आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता महात्मा ज्योतिबा फुले चौक, पोस्ट ऑफीस जवळ याचे आयोजन होत आहे. यानिमित्त उत्कृष्ट नंदी बैल आणि सजावट तसेच उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरीत केल्या जाणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष  हंसराज अहिर आणि रघुवीर अहिर यांची मुख्य उपस्थिती लाभणार आहे.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनूले,मुख्याधिकारी संदीप दोडे,पोलिस निरिक्षक सुमित परतेकी,माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे,भाजपाचे शहराध्यक्ष प्रभाकर भोयर,अनिल संतोषवार,अनिल साखरकर,मारोतराव पुल्लावार,दिलीप सुचक,अरूण येनप्रेडडीवार यांची प्रमूख उपस्थिती राहणार आहे.तान्हा पोळा उत्सवाच्या प्रित्यर्थ उत्कृष्ट नंदी आणि सजावट स्पर्धेत पहिले बक्षिस  एलईडी टिव्ही,दुसरे बक्षिस रेंजर सायकल,तिसरे बक्षिस मिडीयम सायकल तसेच एकूण दहा बक्षिस राहणार आहेत.उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेसाठी सुदधा एकूण दहा बक्षिसे राहणार आहेत.विजेत्या स्पर्धकांना ना.सुधीर मुनगंटीवार यांचे कडून आकर्षक शिल्ड भेट देण्यात येणार आहे.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन बक्षिसे देण्यात येणार आहे. तान्हा पोळयाच्या निमित्ताने मूल नगर परिषदेचे उत्कृष्ट कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दरार तान्हा पोळा उत्सव मंडळाचे मुख्य आयोजक दरार दुर्गा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा मूल नगर पालिकेचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ हे आहेत.
मागिल अनेक वर्षापासून मंडळाच्या वतीने तान्हा पोळयाचे आयोजन करण्यात येत आहे.बाल गोपालाच्या सृजनशिलतेला वाव मिळावा,नाविण्यपूर्ण कल्पना त्यांना साकारता यावी,त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी तसेच सणांचे महत्व कळावे  या उददेशाने या तान्हा पोळयाचे आयोजन होत असल्याचे प्रशांत समर्थ यांनी जनतेचा आवाज सोबत बोलताना सांगितले. भारत हा विविध कला संस्कृतीने नटलेला देश आहे. रंग ,रूप,वेष,भाषा वेगवेगळया असल्यातरी,विविध सणांच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन होते.त्यामुळे दरार दुर्गा मंडळाच्या वतीने विविध उपक्रम साजरे करण्यावर भर असतो. दरार दुर्गा मंडळ सामाजिक कार्याला वाहलेले मंडळ आहे.दरार दुर्गा मंडळाच्या वतीने दुर्गा देवीची प्रतिस्थापना सुदधा केल्या जाते.मूल वासियांनी दरार तान्हा पोळा उत्सव कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि उपस्थित बाल गोपालांचा उत्साह वाढवावा  असे आवाहन दरार दुर्गा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष  प्रशांत समर्थ आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  केले आहे.