ख्रिस्ती समाज बांधवांचा सातला कफनपेटी मोर्चा
स्मशानभूमीच्या जागेची मागणी, चाळीस वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत
मूल :- चाळीस वर्षापासून ख्रिस्ती समाज बांधवाना कब्रस्तान साठी जागा मिळाली नाही.प्रशासन वारंवार उडवाउडवीची उत्तरे देत आहे.संवेदनशिल असलेल्या या प्रश्नांकडे शासनाचे सुदधा दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सात आक्टोबरला कफनपेटी मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारल्या जाणार आहे,अशी माहिती मूल येथिल सेंट स्टीफन चर्चचे सचिव डॉ.अझिम यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. ख्रिस्ती समाजातील बांधवाचे निधन झाल्यास त्या पार्थिवाला दफन करायचे कुठे असा गंभीर प्रश्न आमच्या पुढे आहे. मूल मध्ये त्यासाठी कोणतीही जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे आम्हाला अंत्यविधीचे सोपस्कार चंद्रपूर येथे पार पाडावे लागत आहे. मूल ते चंद्रपूरला जाण्या येण्याचा खर्च प्रत्येकालाच परवडण्या सारखा नाही.मागिल 1986 पासून कब्रस्तान साठी जागेची मागणी करीत आहोत.1989,2021 आणि आता 2024 ला परत आम्ही नगर पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला.बैठकी झाल्या. परंतु पालिका प्रशासन आणि महसूल विभाग सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे नाईलाजाने सात आक्टोबरला कफन पेटी मोर्चा काढल्या जाणार आहे. सेंट स्टिफन्स चर्च पासून तहसिल कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडक देणार आहे.अशी माहिती डॉ.अझिम यांनी दिली.सीएनआय चर्च मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला अॅड.अश्विन पालीकर,फादर ऑन्टोनी परीच्छा, नंदकिशोर कावळे,हरीदास मेश्राम,अशोक टिंगसुले,यांच्यासह ख्रिस्ती समाज बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रीया :- प्रशासन आणि शासन आमच्या ख्रिस्ती समाज बांधवांवर अन्याय करीत आहेत. चाळीस वर्षांपासून स्मशानभूमी साठी जागेची मागणी करीत आहोत.त्या मागणीला केराची टोपली दाखविली जात आहे. उमा नदीच्या परिसरात असलेली सर्व्हे नंबर 282 ची जागा आमच्यासाठी सोईस्कर आहे.पंरतु त्या जागेवर एका अराजकीय व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. त्या जागेसाठी नगर पालिका आणि उपविभागीय अधिकारी यांचे कडे पत्रव्यवहार केला. जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. प्रशासनाने सहमती सुदधा दर्शविली. मात्र, माशी कुठे शिंकली माहित नाही.ती जागा सोडून ग्रामपंचायत स्तरावर जागा शोधण्याचे आता प्रशासन सांगत आहे. यातून प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून येत आहे.आम्हाला न्याय दयायचा नसल्याने प्रशासन हात झटकत आहे. समाजातील बांधवाचा मृत्य झाल्यास त्याचे अंत्यविधी करायचे कुठे ? याचे उत्तर पालिका प्रशासनाने दयावे. दोन नोव्हेंबर हा दिवस आमच्या साठी महत्वाचा दिवस असतो.त्यासाठी आम्ही कब्रस्तानात जावून प्रार्थना करतो.पंरतु प्रशासनाला हा प्रश्न सोडवायचा नसल्याने उडवाउडवीचे उत्तर देत आहेत.त्यामुळे कफन पेटी मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाकडे न्याय मागित आहोत.त्यानंतरही प्रश्न सुटला नाही.तर,आम्ही आक्रमक भूमिकेचा वापर करून न्याय पदरात पाडून घेवू. – अॅड.अश्वीन पालीकर