हल्लेखोर टी – 83 वाघीण जेरबंद
वनविभागाची कारवाई,शार्प शुटरने धरला अचूक नेम
मूल :- मूल तालुक्यात धुमाकूळ घालणा-या टी-83 नावाच्या वाघीणीला जेरबंद करण्यास अखेर यश मिळाले.शनिवारी सकाळी 5.30 वा. चिचपल्ली वन परिक्षेत्राच्या जानाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 717 मध्ये शार्प शुटरने अचूक नेम धरून तिला बेशुदध केले. ही कारवाई वनविभागाने संयुक्त रित्या राबविली. या वाघीणीने गावकरी आणि वनविभागाला जेरीस आणले होते. मागिल तीन वर्षात या वाघीणीने जवळपास अकरा जणांचा बळी घेतला होता. आता टी 87 नावाचा वाघ जेरबंद करण्याच्या प्रतिक्षेत आहे. दोन वाघांना जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. टी-83 नावाची वाघीण सतत वनविभागाला हुलकावणी देत होती.प्रादेशिक आणि बफर क्षेत्रात तिची भटकंती सुरू होती.दोन्ही क्षेत्रामध्ये वनविभागाने पिंजरे लावले होते.जुना सोमनाथच्या परिसरात एक रेडा बांधून ठेवण्यात आलेला होता. त्या रेडयाला ठार मारल्यानंतर वाघीण जानाळा नियतक्षेत्रात असल्याचे माहित झाल्यानंतर शार्प शुटरने अचूक नेम धरून तिला बेशुदध केले.प्रादेशिक आणि बफर वनविभाग वाघीणीच्या मागावर होते. वाघीण जेरबंद झाल्याने वनविभागाने सुटकेचा निःश्वास सोडला.तर गावक-यांच्या मनातील भिती थोडीसी कमी झाली. ही कारवाई चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांच्या सूचनेनुसार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे आनंद रेडडी,विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे,सहायक वनसंरक्षक तरसे,वाटोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिचपल्ली वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे,मूल येथील बफरचे वनपरिक्षेत्राधिकारी राहूल कारेकर यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली.यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे,बायोलॉजिस्ट राकेश आहूजा,शार्प शुटर अजय मराठे यांनी ही मोहीम यशस्वीरित्या राबविली. या मोहीमेत क्षेत्र सहायक खनके,पडवे,मस्के,वनरक्षक राकेश गुरनूले,ठाकूर,शितल व्याहाडकर,शुभांगी गुरनूले,सविता गेडाम,पवन येसांबरे,दिवटे बावणे,आरआरटी टीमचे ताजणे,लाकडे,वाडगुरे,ढोरे,टेभूर्णे,शेख,कोरपे,दांडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
अकरा जणांचा बळी —
टी-83 वाघीणीने मूल तालुक्यातील जानाळा,कांतापेठ,चिरोली,कवडपेठ,चिचाळा,ताडाळा,मूल या परिसरात दहशत माजविली होती.मागिल तीन वर्षान हिने अकरा जणांचा बळी घेतला असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांनी सांगितले.
71 वाघ जेरबंद :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे आणि त्यांच्या चमूने आत्तापर्यंत मानव वन्यजीव संघर्ष प्रकरणातील 71 वाघांना जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.हे येथे उल्लेखनीय बाब आहे.
आता प्रतिक्षा टी-87 वाघाची —
तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिण्यात वाघाच्या हल्ल्यात पाच जणांचा बळी गेला आहे.यातील टी 87 वाघाची आता प्रतिक्षा आहे. हा वाघ नर असून याला जरेबंद करण्यासाठी वनविभागाची चमू कार्यरत आहे.यासाठी ड्रोन कॅमे-याची मदत घेतली जात आहे.