लाडक्या बहीणीला दिलेले पंधराशे रूपये महागाई वाढवुन बहीणींकडूनच वसुल केले
काँग्रेसच्या विमुक्त जाती जमातीच्या प्रदेशाध्यक्षा अँड. पल्लवी रेणके यांचा आरोप
मूल : काॅंग्रेस सरकार सदैव महिलांच्या पाठीशी राहीला असून महिलांचा सन्मान करीत आहे, याऊलट महागाई वाढवुन महायुती सरकाने महिलांचे कंबरडे मोडण्याचे काम केले असून महिलांचे हक्क आणि अधिकाराचे हरण करण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामूळे न्याय हक्कासाठी महिलांनी यापुढे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे. असे आवाहन काॅंग्रेसच्या विमुक्त जाती जमाती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अँड. पल्लवी रेणके यांनी केले.
बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे काॅंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या निवडणुक प्रचारार्थ महिलांची आढावा बैठक घेण्यांत आली. यावेळी आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष बादल गायकवाड, ममता रावत, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा रूपाली संतोषवार, राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्षा अर्चना चावरे, शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष प्रशांत गट्टूवार, अँड. हिमाणी वाकुडकर, विमुक्त जाती जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय कोरेवार, संघटक अवधुत कोटेवार, विजय बोरगमवार, सुधाकर बडगुजर आदि मान्यवर उपस्थित होते.
जेव्हा झाली मतांची कडकी तेव्हा आठवली बहीण लाडकी यावर भाष्य करतांना अँड पल्लवी रेणके यांनी लोकसभा निवडणुकीत मतदार संघामधून काॅंग्रेस उमेदवारांना आघाडी देवून ३३ कोटी वृक्ष लागवडीत झालेला गैरव्यवहाराचा बदला घेतल्याचे सांगून भगिनींचे स्वागत केले. निवडणुकपुर्वी महायुतीच्या केंद्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांनी बेरोजगारांना शासकिय नोक-या देण्याचे जाहीर केले परंतू किती बेरोजगारांना रोजगार दिले. हे जाहीर करू शकत नाही. राज्यातले उद्योग प्रकल्प इतर राज्यात हलवून रोजगारांना बेरोजगार करणा-यांना महायुती पेक्षा महाविकास आघाडीने राज्याच्या कल्याणाकरीता पंचसुत्री जाहीर केली असून ही पंचसुत्री जनतेच्या कल्याणासाठी महत्वाची असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांना विजयी करण्याचे आवाहन अँड. पल्लवी रेणके यांनी केले. यावेळी शिवसेनेच्या तालुका प्रमुख प्रशांत गट्टुवार यांनी महायुतीच्या शासन काळात बेरोजगारी, महागाई आणि शेतक-यांवर जीएसटी लागु केली, लाडक्या बहीणीसाठी देत असलेले पैसे महागाई वाढवून बहीणींकडूनचं वसुली करीत असल्याने मतदारांनी आयुष्याचा विचार करून महाविकास आघाडीला मतदान करण्याचे सांगीतले. यावेळी राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या शहर अध्यक्ष अर्चना चावरे, जिल्हाध्यक्ष विजय कोरेवार , महिला तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सरपंच रविंद्र कामडी, राहुल मुरकुटे, किसान सेलचे तालुकाध्यक्ष रूमदेव गोहणे, संजय कुंठावार, संजय फुलझेले आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले आणि महिला शहर अध्यक्ष नलीनी आडपवार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनिषा ठुणेकर, शामला बेलसरे, समता बंसोड, वर्षा पडोळे, माधुरी गुरनूले, सिमा भसारकर, फरजाना शेख आदिंनी परिश्रम घेतले.