जुनासूर्ला येथील देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

16
जुनासूर्ला येथील देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
मूलः- सरकारी किंमती पेक्षा जास्त दराने दारूची विक्री करणा-या जुनासूर्ला येथील परवानाधारक देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी येथिल युवासेनेचे माजी तालुका प्रमुख गंगाधर इददुलवार यांनी केली.शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी देशी दारूच्या दुकानासंदर्भातील तक्रारीचा पाढा वाचला. याकडे उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत आहे.याबाबत ग्रामपंचायत जुनासूर्ला येथे देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी करणारे पत्र दिल्याचे इददूलवार यांनी सांगितले. 90 एमएल दारूच्या बादलीची किंमत 35 रूपये असतानाही ती बाटल 40 रूपये प्रमाणे विक्री केल्या जात आहे. परवानाधारक वेळेचे बंधन सुदधा पाळत नाही. अवैधपणे साठा पुरवठा केल्या जाते इत्यादी आरोप इददूलवार यांनी केले. दारूच्या व्यसनामुळे नागरिकांचे संसार उदध्वस्त होत असून शालेय विदयार्थी,गावकरी आणि युवावर्ग व्यसनाधिनतेकडे वळत असल्याचे इददूलवार यांनी सांगितले.ग्रामपंचायतने ठराव पारित करून देशी दारूचे दुकान बंद करावे अशी मागणी गंगाधर इददूलवार यांनी केली. पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य खुशाल टेकाम,राकेश कडडलवार,प्रशांत वनकर,संदिप गिरडकर,विलास यारेवार,नामदेव कंकलवार,अमोल कंबलवार,राजेश गोवर्धन उपस्थित होते.