सेवा परमो धर्मः
——————
‘‘ सेवा परमो धर्मः‘‘ हे आमचे लाडके नेते ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे ब्रिद वाक्य आहे.संकल्प विकासाचा – ध्यास जन कल्याणाचा हे भाऊंचे ध्येय आहे. जनसेवा हिच ईश्वरसेवा आहे.जो आनंद जनसेवेत मिळतो तो आनंद इतर कोणत्याही गोष्टीत मिळत नाही. ज्या भूमीत आपला जन्म झाला,त्या भूमीचे ऋण आपण फेडले पाहिजे.या मातीने आपल्याला लळा लावला,विकासाची संधी दिली.त्या संधीचे सोने करण्याची ताकद जनसेवेतून मिळाली पाहिजे.तोच लोककल्याणाचा ध्यास मागिल पंधरा ते वीस वर्षांपासून सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी चालविला आहे. घेतलेला वसा ,संकल्प एकदा हाती घेतल्या नंतर ते पूर्ण करण्या पर्यंत भाऊ स्वस्थ बसत नाही. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ना.सुधीर मुनगंटीवार हे आहे. विकास काय असतो आणि विकासाची गंगा कोणाला म्हणतात,हे भाऊंच्या विकासात्मक कार्यक्रमातून जनतेने ओळखले आहे.
सेवा परमो धर्मः म्हणजे जनतेची , मतदारांची,रंजल्या गांजल्यांची सेवा करण्यात जो आनंद मिळतो, तो खरा आनंद. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात सेवा परमो धर्मः या ब्रीद वाक्यानुसार नेत्ररोग तपासणी शिबिर घेतले.या शिबिराचा हजारो रूग्णांना फायदा झाला.रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. मोतीबिंदू सारखे ऑपरेशन सुलभरित्या पार पडले. ग्रामिण भागाच्या लोकांसाठी फिरता दवाखाना सुरू करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतल्या गेली. कॅन्सरचा योग्य इलाज व्हावा यासाठी कॅन्सर रूग्णांसाठी तपासणी व्हॅन सेवेत दाखल केली. दिव्यांगाना जयपूर फुटचे वितरण केले,दिव्यांगाना तीन चाकी सायकलचे वाटप केले. हृदयरोग रूग्णासाठी त्यांच्या योग्य उपचारांसाठी मदत केली. यासह इतर अनेक रूग्णांच्या आरोग्याची काळजी भाऊंनी घेवून त्यांच्यात आशेचा नवा किरण दाखविला.
वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे त्यांचे मुख्य उद्यिष्टे आहे. भाऊंच्या याच समाजकारणातील सेवाभावी कार्यामुळे अनेक रूग्णांना वेळीच मदत मिळाली. त्यांच्या जीवनात सुधीर मुनगंटीवार यांच्या मुळे नवा प्रकाश मिळाला. एक सुदिन त्यांच्यात निर्माण झाले. नवं नवे संकल्पना राबविण्याचा हातखंड सुधीर मुनगंटीवार यांच्या शिवाय दुसरा कोणताच लोकप्रतिनिधी राबवू शकत नाही. हे काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
विकासाचा नवा अजेंडा बल्लारपूर विधानसभेने अख्या महाराष्ट्राला दाखविला. ना.सुधीर मुनगंटीवार हे एक ऊर्जावान स्त्रोत आहे.त्यांच्यातली ऊर्जा कार्यकर्त्यांना,जनतेला प्रेरणादायी ठरावी अशीच असते. सूर्या सारखे तेज असलेली व्यक्ती म्हणजे सुधीर मुनगंटीवार ही आहे. जनकल्याणाचा ध्यास असलेल्या या माणसाने मूल मध्ये शंभर खाटांच्या रूग्णालयाच्या बांधकामाचे भूमीपुजन करून नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रत्येक नागरिकांना आरोग्याची उत्तम सेवा मिळाली पाहिजे. तात्काळ उपचार त्याच्यावर झाले पाहिजे यासाठी भाऊंचा असलेला खटाटोप , सेवा परमो धर्मःची प्रचिती देते.
विरोधी बाकावर असताना सुदधा सुधीर भाऊंनी स्व.मा.सा.कन्नमवार सांस्कृतिक सभागृह उभारले. परिसरात स्व.मा.सा.कन्नमवार यांचा पुतळा उभारला.याच सभागृहात उदघाटन प्रसंगी स्व.कन्नमवारजींच्या नातेवाईकांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करून त्यांना सन्मानाचा मान दिला. आपल्या भागातील स्व.मा.सा.कन्नमवारजी म्हणजे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री.त्यांना त्यांच्या कर्मभूमीत योग्य सन्मान देण्याचे भावपूर्ण कार्य ना.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या शिवाय दुसरे कोणीच करू शकले नसते. जे अशक्य ते शक्य करण्याचे काम भाऊंनी केले. ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. किनारा फक्त सागराला लाभला आहे,पण भाऊंनी किना-याच्या पलिकडे जाऊन विकासाचा सागर तयार केला.
जिथे नजर तिथे सुधीर भाऊंचा विकास हाच मुलमंत्र पुढेही जोपासण्यासाठी सुधीर भाऊ पुन्हा मतदार संघासाठी हवे आहेत.अशा अनेक संकल्पना आहेत,ज्या भाऊंच्या मनात आहेत,त्याच मतदारांच्या मनात आहेत.मात्र,त्या प्रत्यक्षात साकारण्यासाठी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना आपण विजयी भव असे म्हटले पाहिजे. त्यासाठी ऐकी,निष्ठा आणि आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.