संपादकीय – मूल शहरातील वाढते गुन्हेगारीकरण एक चिंतेचा विषय – शांतताप्रिय मूल अशांततेच्या गर्तेत

323
संपादकीय
मूल शहरातील वाढते गुन्हेगारीकरण एक चिंतेचा विषय


शांतताप्रिय मूल अशांततेच्या गर्तेत


 मूल शहरातील वाढत्या गुन्हेगारीकरणामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सततच्या होणा-या हिंसक घडामोडीमुळे गावात दहशतीचे चित्र तयार होत आहे.गुंडगिरी करणा-या युवकाचे टोळके पानठेल्यांवर बसून चिडीमारी करीत असल्याने त्यातून शहरातील वातावरण बिघडत चालले आहे. ठिकठिकाणी असणा-या शहरातील पानठेल्यांवर असे टोळके शिगारेटचे धुरके सोडताना अनेकाच्या निदर्शनास आहे.शालेय आणि महविदयालयीन  मुलींना पाहून बाईक धुम स्टाईल पळविणे,अश्लील बोलणे,शाळा ,महाविदयालय सुटण्याच्या वेळेस येरझारा मारणे अशा विविध कारणांमुळे गुंडगिरी वाढत चालली आहे. याकडे स्थानिक पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गुंडगिरी करणा-या युवकांची हिंमत वाढत चालली आहे.वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील युवक धुम स्टाईल वाहने चालवून शालेय मुलींना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असल्याने यातूनही गुंडगिरी वाढत असल्याचे बोलल्या जात आहे.तसेच मूल शहरामध्ये विविध ठिकाणी चरस गांजा गुटखा यांचा अवैध वापर आणि विक्री होत असल्याचे बोलल्या जाते.त्याच्याही आहारी युवक जात असल्याने त्यातूनही शहरात गुंडगिरी वाढण्यास कारणीभूत असल्याचे बरेच नागरिक बोलतात.   नुकतेच मार्निंग वॉकच्या सदस्यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देत मूल शहरातील चरस गांजाचे अडडे बंद करण्याची मागणी केली होती. मूलमधील कर्मवीर महाविदयालयाच्या पटांगणावर अवैध पणे दारू ढोसण्याचे प्रमाण सुदधा वाढले आहे. त्याठिकाणी  दारू आणि बियरच्या रिकाम्या बाटल्या दररोज आढळत असल्याने अवैध कृतीने शहरात कळस गाठल्याचे लक्षात येत आहे. मूल मधील वाढत्या गुन्हेगारीकरणामुळे शहरातील पालंकामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.युवकांमध्ये  गुंडगिरी वाढल्याने नागरिकांमध्ये एक दहशतीचे वातावरण आहे.शाळेत जाणारा आपला पाल्य सुरूक्षित शाळेत जात आहे का किंवा शाळेतून सुरूक्षित घरी परतणार काय , याविषयी पालकंामध्ये चिंता व्यक्त केल्या जात आहे.

पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष:-शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात मूल पोलिस प्रशासनायला अपयश येत आहे.त्यांचे  अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने शहरातील अवैध कृत्यांमध्ये वाढ होत असल्याचे बोलल्या जात आहे.  धुम स्टाईल बाईक चालविण्यावर कोणतीही कारवाई केल्या जात नाही. पानठेल्यांवरील युवकांच्या टोळक्यांवर नजर ठेवल्या जात नाही.रात्री दहा नंतर सुरू असणा-या पानठेला धारकांवर कारवाई केल्या जात नाही.अवैध धंदयावर अंकूश बसविल्या जात नाही.हे सर्व करणार कोण?असा प्रश्न नागरिक विचारत आहे. शालेय,महाविदयालय,बसस्थानक,क्रीडांगण,रेल्वे स्टेशन,विहीरगाव तलाव परिसरात  पोलिसांची पेट्रोलिंग आवश्यक असताना ती केल्या जात नाही.पोलिस प्रशासनाचा कोणताही दबाव शहरात दिसत नसल्याने हिंसाचार वाढण्यास मदत होत असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान,मूल पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी आणि  कर्मचा-यांची कमतरता असल्याचे संागितले जाते. परंतु ,मूल शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम कोणाचे असा प्रश्न नागरिक विचारत असून शांतताप्रिय मूल शहराला अशांततेच्या गर्तेत कोण ढकलत आहे,त्याविरूदध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शेकडो पालकंाच्या मनातील दहशत दूर करून मूल शहराला आदर्श गाव करण्याची मागणी या निमित्ताने होत आहे.

वचक कमी होत चालला:- समाज,पालक,शिक्षक आणि प्रशासनाचा वचक कमी होत चालल्याने युवकांमध्ये हिंसक कृती करण्याची हिंमत दिवसंेदिवस वाढत चालली आहे.राग अनावर होत असल्याने त्यातून हिंसक घडामोडीत भर पडत आहे. या सर्वांची भिती बाळगणे कमी होत चालली आहे. कायदयाची भिती सुदधा कमी होताना दिसत आहे. युवकांचे शिक्षणाकडे होत जाणारे दुर्लक्ष या सर्व घडामोडीला कारणीभूत ठरत आहे.बेरोजगारी आणि मित्राच्या संगतीचा परिणाम यासर्व बालमनावर पडत असल्याने त्यातून हिंसक कृतीत भर पडत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. मानसिक विकृती निर्माण होत आहे.अल्पवयीन असतानाच अवैध धंदयात आणि व्यसनेच्या आहारी अनेक युवक गुंतून जात असल्याने टोळी टोळीच्या माध्यमातून गुंडगिरीला मोठे प्रोत्साहन मिळत आहे. यासाठी शाळा महाविदयालयात प्रबोधनात्मक कार्यक्रमावर भर देणे आवश्यक आहे. वाढते गुन्हेगारीकरण एक चिंतेचा विषय ठरला आहे.