माजी विदयार्थ्यांनी केला गुरूंचा भावपूर्ण सत्कार
कवठी येथे कृतज्ञतापूर्वक स्नेहमिलन सोहळा
मूल :- कवठी येथील शहीद सुरेश पाटिल सुरकर विदयालयातील माजी विदयार्थ्यांनी येथील गुरूंचा भावपूर्ण सत्कार केला.सन 2010 या शैक्षणिक सत्रातील माजी विदयार्थ्यांनी एकत्र येत सोमवारी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला. कार्यक्रमाचे आयोजन विदयालयाच्या पटांगणात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे मुख्याध्यापक के.व्ही.खोब्रागडे हे होते.प्रमूख पाहूणे म्हणून सहा.शिक्षक विनायक हजारे,विनायक रेकलवार,मधुकर डोंगरे,लता सलामे,विशाखा सुत्रपवार , लक्ष्मण तांगडे, जयंत वनकर,अनिल ठाकूर, सुनील टेप्पलवार,गीता अर्जुनकार उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दीप प्रज्वलन यावेळी करण्यात आले.शाल श्रीफळ देवून माजी विदयार्थ्यांनी मुख्याध्यापक के.व्ही.खोब्रागडे यांचा सत्कार केला.तसेच विनायक हजारे आणि प्रयोगशाळा परिचर जयंत वनकर यांचाही दुप्पटा आणि श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.बारा वर्षांनंतर माजी विदयार्थ्यांनी एकत्र येत शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.त्यानिमित्त त्यांनी शाळेला लोखंडी कपाट भेट दिली. माजी विदयार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. विदयार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी. मिळालेल्या ज्ञानाचा समाजासाठी परिपूर्ण उपयोग करावा.गुरूंसाठी सर्वच विदयार्थी सारखे असतात.माजी विदयार्थी मेळावा म्हणजे गुरू आणि शिष्याच्या नात्याची घटट वीण असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. माजी विदयार्थी राहूल ठाकरे यानेही आपले मनोगत सादर केले.कार्यक्रमाचे संचालन माजी विदयार्थी दुमाजी भोयर याने तर आभार श्रवण मारकवार याने मानले.कार्यक्रमाला माजी विदयार्थी,विदयार्थींनी आणि शाळेचे विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.