सुरकर विदयालयातील सहा.शिक्षक डोंगरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार

120

सुरकर विदयालयातील सहा.शिक्षक डोंगरे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार
निरोप समारंभात दहावीच्या विदयार्थ्यांना भावपूर्ण शुभेच्छा

मूल :- कवठी येथील शहीद सुरेश पाटिल सुरकर विदयालयातील सहा.शिक्षक मधुकर डोंगरे यांचा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाल्या बददल विदयालयाच्या वतीने त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता 10 वीच्या विदयार्थ्यांना बोर्डाच्या परिक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विदयालयाच्या पटांगणात 14 फेब्रवारी रोजी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.समारंभाच्या अध्यक्षस्थानी शहीद सरेश पाटिल सुरकर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तुकाराम पाटिल सुरकर हे होते.प्रमूख पाहूणे म्हणून सरपंचा कांताताई बोरकूटे,ग्रामपंचायत अधिकारी पी.टी. पारधी,अल्काताई सुरकर, ग्रामपंचायतच्या सदस्या संगीता पाल,मनिषा कोसरे,रंजना बोरकूटे,डिंम्पल धोटे, विदयालयाचे मुख्याध्यापक के.व्ही.खोब्रागडे ,माजी सरपंच डोपाजी पाटिल बटटे, माजी सरपंचा देविकाताई बटटे,प्रकाश पाटिल घोटेकार,ईश्वर पाटिल बटटे,माजी उपसरपंच देवराव चिताडे,प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी प्रिती वनकर,धनराज बटटे,सुधाकर श्रीकोंडावार,कमलाकर बोरकुटे,गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष बेंडू पाटिल बोरकूटे,मुकरू चित्रम, वासुदेव कोसरे,मधुकर डोंगरे,बरखा डोंगरे  आदि उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन,मालार्पण आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.नियत वयोमानानुसार 31 डिसेंबर 2024 रोजी सेवानिवृत्ती झाल्याबददल सहा.शिक्षक मधुकर डोंगरे यांचा विदयालयाच्या वतीने शाल श्रीफळ,कपडे आणि साडीचोळी देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता 10 वीच्या विदयार्थ्यांना बोर्डाच्या परिक्षेसाठी शुभेच्छा देवून त्यांना निरोप देण्यात आला. सत्काराप्रसंगी मधुकर डोंगरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी सरपंचा कांताताई बोरकुटे,आरोग्य अधिकारी वनकर,सहा.शिक्षक वि.ओ.रेकलवार,विशाखा सुत्रपवार यांनी मनोगत व्यक्त केले.विदयार्थ्यांनीही आपले विचार व्यक्त केले. समारंभाचे प्रास्ताविक सहा.शिक्षक व्हि.डी.हजारे यांनी केले.संचालन वर्ग 9 वीच्या विदयार्थीनी सानिका घोटेकार,प्राची घोटेकार आणि यामिना नायबनकार यांनी केले.आभार सहा.शिक्षिका लता सलामे यांनी मानले.इयत्ता आठवीच्या विदयार्थींनीनी यावेळी स्वागतपर एक नृत्य सादर केले. दहावीच्या विदयार्थ्यांनी विदयालयाला बेडशिट भेट दिली. स्वादीष्ट भोजनाने समारंभाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी लक्ष्मण तांगडे,अनिल ठाकूर,जयंत वनकर,सुनिल टेप्पलवार,गीता अर्जूनकार,लीलाबाई भगत यांनी अथक परिश्रम घेतले.
डोंगरे यांना पुढील आयुष्य सुखकर जावो आणि 10 वीच्या विदयार्थ्यांनी यशाची उंची गाठावी – मुख्याध्यापक खोब्रागडे
निरोप समारंभात मुख्याध्यापक के.व्ही.खोब्रागडे यानी सेवानिवृत्त सहा.शिक्षक मध्युकर डोंगरे यांना पुढील आयुष्य सुखकर जावो अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच दहावीच्या विदयार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून यशाची उंची गाठावी अशा शुभेच्छा दिल्या. दिलेली जबाबदारी उत्तम आणि उत्कृष्ठ रित्या पार पाडून मधुकर डोंगरे यानी विदयालयाचा मान वाढविला.विदयालयाच्या गुणवत्तेसाठी  नेहमी तत्परता दाखविली.विदयालयाला त्यांची उणीव जाणवत राहील अशा शब्दात त्यांनी डोंगरे यांच्या बददल भावोद्गार काढले.