सर्वच स्तरातील शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न – आ.सुधाकर अडबाले
मूल :-शिक्षक आमदार म्हणून प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विदयापीठ स्तरीय सर्वच शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन आ.सुधाकर अडबाले यांनी केले.सावली येथील राष्ट्रपीता महात्मा गांधी महाविदयालयात सुरू असलेल्या शिक्षक क्षमता वृदधी 2.0 प्रशिक्षण केंद्राला त्यांनी शुक्रवारी भेट दिली.त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रशिक्षण केंद्राच्या वतीने सावली येथील गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे यांनी त्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.याप्रसंगी राष्ट्रपीता महात्मा गांधी महाविदयालयाचे प्राचार्य चंद्रमोली, विमाशीचे जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी,गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे,प्रा.रवी झाडे,शिक्षण विस्तार अधिकारी बावणे,प्रा.खोब्रागडे यांची प्रमूख उपस्थिती होती.बदलांची जाणीव शिक्षकांना व्हावी,त्यांच्यात विविध क्षमतांची वृदधी व्हावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत हे शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विदयार्थी हा केंद्र बिंदू मानून शिक्षकांनी नेहमी अपडेट राहिले पाहिजे.विदयार्थ्यांच्या हितासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.परिक्षांच्या कालावधी मध्ये हे प्रशिक्षण सुरू असल्याने प्रशिक्षणाचा कालावधी चुकल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली.मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजे यासाठी शिक्षकांनी दर्जेदार शिक्षण विदयार्थ्यांना दयावे असे आ.अडबाले म्हणाले. यावेळी त्यांनी वेतनेत्तर अनुदान,मुख्यमंत्री माझी शाळा, शाळा अनुदान,अल्प वेतन,थकबाकी देयके ,वरिष्ठ श्रेणी,निवड श्रेणी यावर विस्तृत चर्चा केली.शिक्षकांना भेडसावणा-या समस्यांचे त्यांनी यावेळी निराकरण सुदधा केले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे यांनी केले.संचालन प्रशिक्षण केंद्राच्या तालुका समन्वयक बबिता चहांदे यांनी केले. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक,प्रशिक्षणार्थी शिक्षक वर्ग उपस्थित होते.