शेकडो भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ – रविंद्र बोकारे यांच्या घरी गजानन महाराज प्रगट दिन कार्यक्रम – तेरा वर्षांची अविरत परंपरा

72
शेकडो भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ
रविंद्र बोकारे यांच्या घरी गजानन महाराज प्रगट दिन कार्यक्रम
तेरा वर्षांची अविरत परंपरा

मूल :- येथिल सर्व देशबांधवचे संपादक रविंद्र बोकारे यांच्या घरी श्री गजानन महाराज प्रगट दिनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.त्यानिमित्त शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.त्यांची तेरा वर्षांची ही परंपरा अखंडीत पणे आणि अविरतपणे सुरू आहे. बोकारे कुटुंबीयांची शेगावी महाराज श्री संत गजानन महाराज यांच्यावर नितांत श्रदधा आहे. याच श्रदधेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या बोकारे वाडयात राहत्या घरी श्री संत गजानन महाराज प्रगट दिन साजरा करण्याचे ठरविले.त्यानुसार त्यांनी या उत्सवाला सुरूवात केली.मागिल तेरा वर्षां पासून ही परंपरा अविरत पणे सुरू आहे.नित्यनेमाने सर्व विधी पार पाडले जातात. श्री संत गजानन महाराज प्रतिमेचे पुजन, पारायण ,पुजा पाठ,आरती, छुनका भाकरचा प्रसाद, नैवेध आदी गोष्टी कटाक्षाने पार पाडल्या जातात.त्यांनंतर भाविकांना संध्याकाळी महा प्रसादाचा लाभ दिला जातो.त्यामध्ये बेसन भाकर,भात,गोड पदार्थ,कांदा, मोहरी जिरा घातलेले कडवलेले तेल,मिरचीची चटणी इत्यादीचा बेत असतो.प्रसादानंतर विडयाच्या पानाचा ठेचा अर्थात तांबूल सगळयांना दिला जातो. मनसोक्त प्रसादाचा लाभ घेऊन भाविक तृप्त होतात. 20 फेब्रवारी 2025 रोजी गुरूवारी झालेल्या  प्रगट दिनाला मूल येथील शेकडो भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. मनोभावे  बोकारे कुटुंबीयांनी साजरा केलेला हा उत्सव अनेकांच्या स्मरणात राहतो.यासाठी बोकारे कुटुंबीय तन आणि मनाने औतपौत जीव ओतून श्री संत गजानन महाराज प्रगट दिनासाठी अविरत परिश्रम घेत असतात.यासाठी रविंद्र बोकारे आणि राजन बोकारे यांच्या मातोश्रीं पुष्पाताई च्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव यशस्वी रित्या पार पाडल्या जातो. 

 
यावेळेस गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त मेघा आणि सीमा बोकारे या स्नुषांनी साकारलेली फुलांची रांगोळी सर्वाचे लक्ष वेधून घेत होती.श्री संत गजानन महाराज प्रतिमेजवळ जमा झालेले पैसे शेगाव येथे संस्थानामध्ये देणगीच्या रूपात जमा केले जातात असे रविंद्र बोकारे यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितले.तसेच  प्रगट दिनाच्या तीन चार दिवसा आधी शेगाव येथे जाऊन महाराजांना निमंत्रण दिल्या जात असल्याचे बोकारे यांनी जनतेचा आवाज शी बोलताना सांगतात.त्यांच्या या तेरा वर्षाच्या परंपरेला मूलवासिय भरभरून प्रतिसाद देतात.