हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्याची सुविधा तालुकास्तरावर दया – मोतीलाल टहलियानी

81
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्याची सुविधा तालुकास्तरावर दया – मोतीलाल टहलियानी
मूल :- राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्वच वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन अर्थात एचएसआरपी नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले आहे.1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सुमारे दोन कोटी 10 लाख वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली आहे.त्याअनुषंगाने जिल्हयावर आरटीओ कार्यालयात वाहन चालकांची मोठी  गर्दी होणार.याबाबत आरटीओ यांनाही काम करणे अडचणीचे ठरेल. त्यामुळे तालुका स्तरावर एचएसआरपीचे शिबिर घेवून सुविधा उपलब्ध करून दयावी आणि अशा नंबर प्लेट साठी धारक असलेल्या वाहनचालकांन नंबर प्लेट बदलवून दयावे अशी मागणी येथील माजी नगरसेवक मोतीलाल टहलियानी यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या कडे केली आहे.तालुका पातळीवर शिबिर घेतल्यास याचा फायदा ग्रामिण भागातील लोकांना मोठया प्रमाणात होईल असे त्यांनी म्हटले आहे. चंद्रपूर जिल्हयात शेतकरी,शेतमजूर,कामगार वर्ग मोठया प्रमाणात आहे.दोन वेळच्या भाकरीसाठी त्यांना अतोनात कष्ट करावे लागते.साप्ताहिक सुटीच्या दिवशी सुदधा काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो.संसाराचा गाडा हाकलताना त्यांना होणा-या कष्टाचे मोल शासनाने जाणून घेवून त्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या कडे असणा-या वाहनासाठी तालुका स्तरावर असे शिबिर आणि सुविधा उपलब्ध करून देणे हिताचे ठरेल असे मोतीलाल टहलियानी यांनी पत्रात नमूद  केले आहे.दुचाकी,चारचाकी आणि ट्रक्टरच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर वर्ग आपला शेतमाल बाजारात आणत असतात.त्यांना आपल्या शेतमालाची चिंता असताना शासनाने एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची सक्ती करून नवीन चिंतेत भर टाकली. 31 मार्चपर्यंत पर्यंत अशी नवीन नंबर प्लेट नाही लावल्यास त्यांची वाहने चालान होण्याची शक्यता आहे. अशा वाहनाची संख्या अधिक आहे.त्यामुळे तालुकास्तरावर सुविधा उपलब्ध करून दयावे आणि वाहनचालकांचा त्रास कमी करावा अशी मागणी मोतीलाल टहलियांनी यांनी केली आहे.अन्यथा मार्गावर वाहने थांबवून आरटीओ साठी कमाईचे नवे साधन उपलब्ध होणार अशी भिती त्यांनी बोलून दाखविली आहे.

एचएसआरपी नंबर प्लेट म्हणजे उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट आहे. ही एक प्रमाणित वाहन परवाना प्लेट आहे.भारत सरकारने रस्त्यांवर धावणा-या सर्व मोटार वाहनांसाठी अनिवार्य केली असली तरी,ग्रामिण भागातील लोकांचा विचार करून तालुक्यात अशी सुविधा उपलब्ध करून दयावी. याबाबत असलेले दर कमी करून महाराष्ट्र राज्यातील जनतेला दिलासा द्यावा  असे मोतीलाल टहलियानी यांनी जनतेचा आवाज शी बोलताना सांगितले.