राखीव जागेवर घनकचरा व्यवस्थापनाचे अवैध बांधकाम – तक्रारीला केराची टोपली

184
राखीव जागेवर घनकचरा व्यवस्थापनाचे अवैध बांधकाम
तक्रारीला केराची टोपली

मूल :- येथील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चिमढा येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून राखीव जागेवर घनकचरा व्यवस्थापनाचे अवैध बांधकाम केले आहे.याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन चौधरी यांनी मूल पंचायत समितीला तक्रार दाखल केली आहे.याविषयी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. तक्रार दाखल करून दहा महिणे लोटले. तरीही संबधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही.दरम्यान, वरिष्ठाच्या आशीर्वादामुळे अवैध बांधकाम झाल्याची शंका चौधरी यांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत चिमढा हददीतील मूल येथील सर्व्हे नंबर 188 व 189 हे.आर ही जागा सरकार कुरण आखर स्मशानभूमी राखीव जागा आहे.याच जागेवर ग्रामपंचायत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत अवैध बांधकाम झाले आहे.या बांधकामाबाबत ग्रामपंचायतने कोणताही जाहिरनामा काढला नाही किंवा जागेवर बांधकामाची परवानगी दिली नाही.संबधित जागा मृत व्यक्तीच्या दफनभूमीसाठी आणि गावातील मृत गुरे ढोरांसाठी  मुकरर ठेवण्यात आली आहे.असे असतानाही ग्रामपंचायत आणि संबधित ग्रामविकास अधिकारी यांच्या संगणमताने बाराशे मिटर लांब जागेवर घनकचराचे अवैध बांधकाम केले आहे.या अवैध बांधकामामुळे शासनाच्या निधीचा दुरूपयोग झाल्याचे चौधरी म्हणतात.संबधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी गजानन चौधरी यांनी केली आहे.याबाबत त्यांनी मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,तहसिलदार यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे.


स्मशानभूमीसाठी राखीव जागेवर होत असलेल्या घनकचराच्या अवैध बांधकामाबाबात तक्रार करून दहा महिण्यांचा कालावधी लोटला.तरीही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही आणि  कारवाई केली नाही.पाणी कुठेतरी मूरल्याने प्रशासनाविषयी शंका उत्पन्न होत आहे.संबधित बांधकाम प्रशासनातील एका कर्मचा-यानेच केल्याचे बोलल्या जाते.त्यामुळे कदाचित कार्यवाही आणि कारवाई झाली नसावी अशी शंका आहे. दि.19.09.2024 च्या तक्रारीला प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे. लांबवर बांधलेल्या घनकचरा मध्ये कचरा टाकायला जाणार कोण?याविषयी प्रश्नचिन्ह आहे.
श्री.गजानन चौधरी,चिमढा