मूल तालुक्यातील चार तलावांच्या दुरूस्तीसाठी निधी – शेकडो शेतक-यांना होणार फायदा – माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचा पाठपुरावा

74
मूल तालुक्यातील चार तलावांच्या दुरूस्तीसाठी निधी
शेकडो शेतक-यांना होणार फायदा
शोभाताई फडणवीस यांचा पाठपुरावा

मूल :- तालुक्यातील चार तलावांच्या दुरूस्ती करणासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे.यासाठी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी जलसंपदा मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता.ब्रिटीशकालीन असलेल्या नलेश्वर तलावाला 100 वर्षे पूर्ण झाले.1923 मध्ये या तलावाची निर्मिती झाली.शेतक-यांच्या शेतीसाठी व्यवस्थित पाणी मिळावे यासाठी पाच कोटी रूपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती शोभाताई फडणवीस यांनी सांगितली. या निधीतून नलेश्वर तलावाच्या नहराचे दुरूस्तीकरण करण्यात येणार आहे.मूल येथिल बसस्थानकाजवळच्या  मामा तलावाचे येवा दुरूस्तीसाठी 1 कोटी 67 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे.येथिल येवा दुरूस्ती झाल्यास जंगलव्याप्त करवन येथील शेकडो शेतक-यांना फायदा होणार आहे.जानाळा तलावाच्या नहर दुरूस्तीसाठी 20 लाख रूप्ये आणि रामपूर तलावाच्या दुरूस्तीसाठी एक कोटी रूप्ये मंजूर करण्यात आले आहे. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तलाव आणि नहर दुरूस्तीकरणामुळे त्यामुळे तालुक्यातील हजारो शेतक-यांना याचा फायदा होणार आहे.मागिल अनेक वर्षांपासून हा पाठपुरावा सुरू होता.नुकत्याच झालेल्या एका बैठकीत तलावांचा प्रश्न निकाली निघाला.हजारो हेक्टरवरील शेती ओलिताखाली येणार असून सिंचनाचा फायदा शेतक-यांना होणार आहे.