कायदा, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणार – परिविक्षाधीन पोलिस उप अधिक्षक प्रमोद चौगूले
मूल :- स्थानिक शहरातील आणि तालुक्यातील कायदा, शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत येथील परिविक्षाधीन पोलिस उप अधिक्षक प्रमोद चौगूले यांनी व्यक्त केले. येथिल मूल तालुका पत्रकार संघाच्या सदिच्छा भेटीत ते बोलत होते. सांगली येथील प्रमोद चौगूले हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलिस उप अधिक्षक पदाची परीक्षा पास आहेत. त्यांचा दोन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी सुरू आहे. नाशिक येथे एक वर्षाचे प्रशिक्षण आटोपल्यानंतर प्रत्यक्ष कृतीशिल सेवेसाठी तीन तीन महिण्यांचा प्रशिक्षण कालावधी पोलिस ठाणे देवून होत आहे.त्यांनतर त्यांची पोलिस उप अधिक्षक पदासाठी वर्णी लागणार आहे. सध्या त्यांचा परिविक्षाधीन कालावधी मूल पोलिस ठाणे येथे होत आहे. सध्याचे युग स्पर्धा परिक्षांचे आहे. अभ्यास करून स्पर्धा परिक्षेत यश मिळवणे कठीण नाही. विदयार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांंमध्ये चांगले यश संपादन करून उच्च पदावर काम केले पाहिजे. चांगल्या पदावर काम करण्यासाठी मेहनत आणि कठीण परिश्रमाची गरज असते.त्याच बरोबर आत्मविश्वास बाळगणे महत्वाचे आहे. तसेच आपले ध्येय साध्य करणे गरजेचे आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून असेच ध्येय साध्य करून प्रमोद चौगूले यांनी पोलिस उप अधिक्षक पदाची परिक्षा पास झाले. पोलिस खात्यामध्ये चांगल्या सेवेची संधी आहे. याच संधीचे सोने करून येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणे आणि गुन्हेगारांना वठणीवर आणणे हे मोठे जिकरीचे काम आहे. शहराच्या शांततेसाठी प्रत्येकालाच एक चांगले वळण लागणे आवश्यक आहे.त्यासाठी नागरिकांनी सुदधा पोलिस प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. अवैध धंदे आणि अवैध कृत्यांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांचे एक मार्निग ग्रुप सज्ज आहे.त्यामाध्यमातून पोलिसांचे एक पथक ठिकठिकाणी गस्ती घालण्यचे काम करीत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था आणि विविध गोष्टींवर पोलिस प्रशासनाची बारीक नजर असल्याचे प्रमोद चौगूले यांनी सदिच्छा भेटीत सांगितले. मूल तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्याचे पोलीस ठाण्यात पुष्पगुच्छ देवून स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. पुढील यशस्वी वाटचाल व कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम,उपाध्यक्ष युवराज चावरे,सचिव विनायक रेकलवार,प्रा.चंद्रकांत मणियार,दीपक देशपांडे,भोजराज गोवर्धन आदी सदस्य गण उपस्थित होते.