मुलाच्या अनुकंपा नियुक्ती साठी आईचे  उपोषण – आदिवासी विधवा महिला न्यायाच्या प्रतिक्षेत

74
मुलाच्या अनुकंपा नियुक्ती साठी आईचे  उपोषण
आदिवासी विधवा महिला न्यायाच्या प्रतिक्षेत
मूल:- विज्ञान शाखे मध्ये पदवीधर असलेल्या मुलाला अनुकंपा तत्वावर नियुक्त्ी मिळावी यासाठी आईने बुधवार पासून उपोषणाला सुरूवात केली आहे. येथील नवभारत विदयालयाच्या समोर कुटुंबासह बेमुदत उपोषणाला बसलेल्या या  आदिवासी विधवा महिलेचे नाव हर्षकला मुनीम सिडाम असे आहे. नोकरी अभावी त्यांना आर्थिक संकटाला तोंड दयावे लागत आहे.मागिल दोन वर्षांपासून त्या न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
 उपोषणकर्त्या महिला श्रीमती हर्षकला मुनिम सिडाम यांचे पती मुनिम सिडाम हे मूल येथील नवभारत कन्या विदयालयात शिपाई पदावर कार्यरत होते. सेवाकाळात 24 ऑगस्ट 2017 रोजी त्यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर मुलगा आकाश याला अनुकंपा तत्वावर घेण्यात यावे अशी संस्थापकाकडे मागणी केली.विनंती अर्ज सादर केले. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे  शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे सुदधा विनंती अर्ज सादर करून न्याय देण्याची मागणी केली. मुख्य म्हणजे आकाश हा विज्ञान शाखे पदवीधर आहे.तसेच नवभारत कन्या विदयालयात विज्ञान सहायक पद रिक्त आहे.असे असतानाही अनुकंपा तत्वावरच्या नोकरीसाठी टाळाटाळ का केल्या जात आहे,असा प्रश्न हर्षकला सिडाम यांना पडला आहे.अनुकंपा तत्वाच्या नियुक्ती बाबत उच्च न्यायालयाच्या 2024 च्या याचिकेत काही गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. अनुकंपा तत्वावर मुलाला घेतल्या जात नसल्याने हर्षकला सिडाम या  10 जुलै 2023 मध्ये सुदधा उपोषणास बसल्या होत्या. आश्वासना व्यतिरिक्त त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. शेवटी हतबल झालेल्या सिडाम यांनी परत एकदा 26 मार्च 2025 पासून उपोषणास सुरूवात केली आहे.आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने कुटुंबाला आर्थिक संकटाला तोंड दयावे लागत आहे.त्यामुळे माझा मुलगा आकाश याला अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळावी.एका आदिवासी विधवा महिलेला न्याय दयावा आणि कुटुंबाची होणारी वाताहात थांबवावी अशी मागणी त्यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे केली आहे.