बारा लाख रूपयांच्या मुददेमालासहीत अवैध दारूसाठा पकडला
मूल:- बारा लाख ऐक्यान्नव हजार रूप्यांच्या मुददेमालासहित अवैध दारूसाठा मूल पोलिसांनी पकडला.ही कारवाई गुरूवारच्या रात्री बेंबाळ मार्गावर करण्यात आली.या प्रकरणी वाहन चालकास अटक करण्यात आली आहे.इतर आरोपींचा मूल पोलिस शोध घेत आहे.एका चारचाकी वाहनाने दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.मिळालेल्या खबरेवरून मौजा नवेगाव भूजला ते बेंबाळ मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. बेंबाळ कडून चांदापूर फाटयाकडे जाणा-या एम एच 34 सीडी 7116 या वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनामध्ये पोलिसांना अवैध दारूसाठा सापडला.अवैध दारूच्या 35 पेटया आणि चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.असा एकूण 12 लाख 91 हजार 540 रूप्यांचा मुददेमाल पकडण्यात आलेला आहे.सदर कारवाई दरम्यान, वाहन चालकास अटक करण्यात आली आहे.इतर आरोपी फरार होण्यास यशस्वी झाले असून त्यांचा शोध मूल पोलिस घेत आहे. खुशाल भैयाजी बांगडे,रा.नांटाफाटा,पवन जयस्वाल रा.बल्लारशा,निखील मंडलवार,रा.व्याहाड अशी आरोपींची नावे आहेत.पुढील तपास परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक प्रमोद चौगूले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जमीरखान पठाण आणि पोलिस अंमलदार नरेश कोडापे हे करीत आहे.आरोपींविरूदध मूल पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.