श्रदधेतून उभारल्या गेले हनुमान मंदिर

85
श्रदधेतून उभारल्या गेले हनुमान मंदिर


मूल:- महाविदयालयीन शिक्षण घेत असताना फिरायला आलेल्या काही विदयार्थ्यांना जुना सोमनाथच्या परिसरात पडलेल्या झाडाखाली एक मूर्ती दिसली. ही मूर्ती होती मारोतीची. विदयार्थ्यांमध्ये श्रदधेचा जागर निर्माण झाला. त्याच श्रदधेतून तयार झाले एक दिमाखदार हनुमान मंदिर. हा परिसर आहे नवीन रेल्वे स्टेशनच्या वनव्याप्त भागात. त्याला जुना सोमनाथ असे नाव आहे. ज्याला मूर्तीचे दर्शन झाले तो विदयार्थी म्हणजे विवेक मुत्यारपवार. दरवर्षी विवेक आणि त्याचा मित्र परिवार येथे हनुमान जन्मोत्सव चा उत्सव मोठया थाटामाटात साजरा करतात.पुजा अर्चा,भजन,गोपाळकाला आणि महाभोजन असा हा कार्यक्रम ठरलेला असतो. मिळालेल्या देणगीतून कार्यक्रमाचा खर्च भागविला जातो.दानशुरांनी दिलेल्या निधीतून सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे.तसेच येथे इतर सोयी सुविधा उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. याठिकाणी पूर्वी पासून घोडदेव सुदधा आहे. या परिसरात आधी पासून गावक-यांची वहिवाट असावी असा अंदाज आहे. येथून ताडाळा मार्गावरील महाबिज केंद्र जवळ आहे. सुनियोजित कार्यक्रम आयोजित करण्याचा कल मित्र परिवाराचा असतो.त्यासाठी श्री साई जुना सोमनाथ हनुमान मंदिर सेवा समिती स्थापन करण्यात आली आहे.समिती आणि श्री साई मित्र परिवार यांच्या संयुक्ताने हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन असते. श्रदधा आणि सबुरीचा मंत्र येथे मित्र परिवारांनी साकार केला आहे.मूल येथील भाविक येथे महाभोजनाचा लाभ घेतात.जवळूनच धावणारी रेल्वे,पक्ष्यांचा किलबिलाट आणि वनाची दाट झाडी यामुळे वातावरणातील प्रसन्नता येथे टिकून राहते. वनव्याप्त भाग असल्याने मंदिर उभारताना मुत्यारपवार यांना आधी विविध संकटाना सामोरे जावे लागले होते.शेवटी हनुमानजींचा आशीर्वाद लाभला.यातून  सुरूळीत मार्ग निघाला आणि दरवर्षी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याचे स्वप्न साकार झाले. आज हे एक मूल मधील महत्वाचे ठिकाण ठरले आहे.जुना सोमनाथ म्हणून असलेला  हा परिसर हळूहळू प्रसिदध आहे.