बफर झोनच्या विदयार्थ्यांनी अनुभवलेला वाघ पुस्तक रूपात
चंद्रपूर जिल्हा परिषदेची निर्मिती,गोष्टी वाघाच्या
मूल:- विनायक रेकलवार
नैसर्गिक साधन संपत्ती आणि वन वैभवाने नटलेला चंद्रपूर जिल्हा पटटेदार वाघासाठी प्रसिदध आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा मोठा भाग जिल्हयात ठिकठिकाणी पसरला आहे.वाघासह इतर वन्यजीवंाची दहशत,भिती,डरकाळी,हल्ले,दोन प्राण्यांची झुंज आणि प्रत्यक्ष दर्शन हे जिल्हावासियांसाठी नवीन नाही. येथील नित्याचेच काम. हाच जंगलातला वाघ बफर झोन मधील विदयार्थ्यांना विविध रूपाने दिसला. तो त्यांना कसा दिसला,त्यांनी त्याचे कसे अनुभव घेतले,गावात,त्यांच्या शेतशिवारात,जंगलात आणि त्यांच्या जनावरांच्या गोठयात त्यांनी कसा थरार अनुभवला , हे शब्दांच्या रूपाने मंाडण्याचे काम बफर झोन मधील जिल्हा परिषदेतील शाळेतील इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतच्या विदयार्थ्यांनी केले आहे.त्यांच्यातील लेखनकलेला जिल्हा परिषदेची निर्मिती लाभली. गोष्टी वाघाच्या या पुस्तकातून विदयार्थ्यांच्या 28 कथा अंगावर शहारे आणणा-या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विदयार्थ्यांच्या वाघ आणि इतर वन्यजीवांच्या कथा खास विदयार्थ्यांसाठी पुस्तक प्रकाशित करून एक नवीन उपक्रम सादर केला आहे. एकीकडे वाघाच्या दहशतीने अनेकांचे बळी जात आहेत.तर, दुसरीकडे जंगल सफारीत वाघाच्या दर्शनाने पर्यटक सुखावत आहे. परंतु,ताडोबाच्या बफर झोन मधील विदयार्थ्यांना वाघ हा काही नवीन विषय नाही.हे हेरून जिल्हा परिषदेने ही नवीन संकल्पना साकारली.बिबटयाची दहशत,रात्रीचा थरार,जंगलातले गाव,वाघ शिरला घरात,वाघाशी सामना,एकीचे बळ,वाघाची डरकाळी,मी पाहिलेला वाघ,वाघ आणि शेळी,झोपडीतला वाघ,काळा बिबटया आणि आजी,हरणाची शिकार,अस्वलाची धडपड,वाघाचे ठसे,सांबराने उडविला गोंधळ अशा विविध 28 कथा विदयार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून लिहल्या आहेत.मुख्य म्हणजे यातील चित्रे स्वतः विदयार्थ्यांनी रेखाटले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांचे विशेष योगदान यासाठी लाभले आहे.शिक्षणाधिकारी प्राथमिक अश्विनी सोनवणे -केळकर यांनी मार्गदर्शन केलेे आहे.पुस्तकाचे संपादक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन्स ऑफीसर अनंत सोनवणे यांनी केले आहे.संकल्पना जिल्हा परिषद कनिष्ठ महाविदयालय ,भद्रावतीच्या कृत्तिका बुरघाटे यांची आहे.सपन्वय सारिका बदेला यांनी निभावली आहे.28 कथांचे संकलन सावली येथील गटसाधन केंद्राच्या विषय साधन व्यक्ती बबिता चहांदे आणि भद्रावती येथील संध्या भगत यांनी केले आहे.मुखपृष्ठ डिझाईन सुदर्शन बारापात्रे यांनी रेखाटले आहे.रणधीर पुदधटवार यांनी टंकलेखन केले आहे.रेणुका पब्लिकेशन्स यांनी पुस्तक प्रिटींग केले आहे.पुस्तकाची किंमत 100 रूप्ये आहे.
अजुनही खुप साहित्य छापण्यासारखे:- बफर झोन मधील विदयार्थ्यांचा जंगलातील प्राण्यांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. इतर वन्यजीव आणि प्रत्यक्ष वाघ यांच्या सोबत आलेला अनुभव त्यांनी आपल्या संकल्पनेतून आपल्या शब्दात मांडला आहे. कुठे आणि कसे काय काय घडले हे त्यांनी आपल्या बोलातून व्यक्त केले आहे.अजुनही खुप काही साहित्य छापण्यासारखे असल्याचे आपल्या मनोगतातून प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी म्हटले आहे.यातील काही मोजक्या 28 कथा निवडून वाचकांपर्यंत गोष्टी वाघाच्या या पुस्तकाच्या रूपाने सादर केल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे बफर झोन मधील विदयार्थ्यांच्या लेखन कलेला वाव मिळाला असून त्यांच्या तील लेखक जागा केला आहे.